सारख कारखान्यांच्या विक्रीत २५ हजार कोटींचा घोटाळा, अण्णा हजारे यांचे अमित शहा यांना पत्र

 

राज्यातील सहकारी साखर कारखान्यांच्या विक्रीत २५ हजार कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आरोप केला असून या प्रकरणाची चौकशी केंद्रीय सहकार मंत्रालयाने सुप्रीम कोर्टाच्या निवृत्त न्यायाधीशांमार्फत करण्याची मागणी त्यांनी केली आहे. हजारे यांनी यासंदर्भात केंद्रीय सहकारमंत्री अमित शाह यांना एक पत्रही पाठविले आहे.

महाराष्ट्रातील अनेक पक्षांचे लोक आणि अधिकाऱ्यांनी भ्रष्टाचार करून शेतकऱ्यांनी आपल्या भाग भांडवल आणि जमिनी देऊन उभे केलेले सहकारी साखर कारखाने कवडीमोल भावाने संगनमताने विकत घेतल्याचा आरोप त्यांनी केला. सहकार क्षेत्र मोडित काढून खासगीकरण वाढीला लावण्याचा हा प्रकार असून त्याची चौकशी करून योग्य कार्यवाही करावी अशी विनंती केली आहे.

तसेचराज्याच्या ऊस उत्पादनाच्या मर्यादेपलीकडे साखर कारखाने उभारण्याची परवानगी देण्यातही पूर्वीपासूनच केंद्र सरकारच्या संबंधित मंत्रालयातील अधिकाऱ्यांनीही मोठी चूक केली असल्याचा आरोपदेखील हजारे यांनी पत्रात केला आता या पत्रावर केंद्रीय सहकारी मंत्री अमित शहा कोणती कारवाई करणार हे पाहावे लागणार आहे.

Team Global News Marathi: