सलमान खानच्या हत्येचा कट, रेकी करणाऱ्या अटक……!

सलमान खानच्या हत्येचा कट, रेकी करणाऱ्या अटक……!

सिने-अभिनेता सलमान खानच्या हत्येचा कट रचणाऱ्या व्यक्तीला उत्तराखंडमधून अटक करण्यात आली आहे. काही दिवसापूर्वी या व्यक्तीने सलमान खान याचे मुंबईतील निवासस्थान असलेल्या भागाची रेखी केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

राहुल ऊर्फ सांगा ऊर्फ बाबा असं या गँगस्टरचं नाव असून तो लॉरेन्स बिश्नोई टोळीचा सदस्य असल्याचं सूत्रांनी सांगितलं. काळवीट शिकारप्रकरणी सलमान खान हा बिश्नोई गँगच्या रडारवर असून या गँगकडून सलमानला या आधीच जीवे मारण्याच्या धमक्या देण्यात आल्या होत्या. पंजाब, हरयाणा आणि राजस्थान या राज्यात ही टोळी सक्रिय आहे.

राहुल उर्फ सागा याने आज तागायत चार हत्या केल्याची माहिती समोर आली आहे. लॉरेन्स बिश्नोईच्या इशाऱ्यावरून त्याने डिसेंबर २०१९मध्ये मनोट येथे एकाची हत्या केली होती. तसेच २० जून २०२०मध्येही त्याने भिवानी येथे एकाची हत्या केली होती. त्याने फरिदाबादच्या एसजीएम नगरमध्येही २४ जून २०२०मध्ये एकाची हत्या केली होती. दिल्लीच्या गुन्हे अन्वेषण विभागाने त्याला उत्तराखंडमधून अटक केली आहे. त्याची चौकशी सुरू असून मुंबई पोलीसही त्याची चौकशी करणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

ग्लोबल न्युज नेटवर्क: