करीन कपूर सूर्यांना आई झाली आहे. तिने काल दुसऱ्यांदा बाळाला जन्म दिला आहे. वांद्रा येथील ब्रिज कॅण्डी रुग्णालयात सकाळच्या वेळी करिनाने मुलाला जन्म दिला आहे. शनिवारी रात्री करिनाला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर रविवारी सकाळी करीनाने बाळाला जन्म दिला.
तसेच बाळ आणि आई दोघांची प्रकृती उत्तम असल्याचे ब्रिज कॅण्डी रुग्णालयातील डॉक्टरांकडून सांगण्यात आलं आहे. गेल्या अनेक दिवसांपासून करीनाच्या चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढलेली होती. ताईच अनेकांनी तिच्या घरी लहान बाळाची खेळणी सुद्धा पाठवली होती. मात्र आता अखेर चाहत्यांची प्रतीक्षा संपलेली आहे.
ऑक्टोबर २०१२ मध्ये सैफ आणि करीनाने निगाह केला होता. २०१६ मध्ये करीना कपूर पहिल्यांदा आई झाली. सैफ आणि करीनाने पहिल्या बाळाचं नाव तैमूर ठेवले होते. मात्र यानंतर तैमूर अली खान या सोशल मीडियावरील सर्वात जास्त लोकप्रियता मिळवणारा स्टार किड ठरला.