मुंबई | शिवसेना पक्ष प्रमुख तथा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काल आजारपणातून बरे झाल्यानंतर पहिल्यांदाच ड्रायव्हिंग करताना दिसून आले. मात्र यावरूनच रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष आणि माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे.
“साहेब गाडी चालवत विधान भवनात आले. आणि महाराष्ट्रा पुढचे सर्व प्रश्न संपले!”, असा खोचक टोला सदाभाऊ खोत यांनी लगावला आहे. दरम्यान यंदाचे अधिवेशन भाजपच्या आरोपांनी आणि मागण्यांनी अधिक गाजत आहे. मात्र सत्ताधारी पक्षातील नेत्यांनी सावध पवित्रा घेतल्याचे दिसून येत आहे.
दरम्यान काल मुख्यमंत्री ठाकरे सभागृहाबाहेर एकदम अॅक्शन मोडमध्ये दिसून आले. दरम्यान उद्धव ठाकरे यांना स्वतः ड्रायव्हिंग करीत असल्याने पाहून माध्यमाच्या प्रतिनिधींनी त्यांच्या गाडीभोवती प्रचंड घोळका केला. आणि दोन्ही सभागृहातील कामकाजात सहभागी होऊन ते सव्वापाच वाजता विधानभवनातून निघाले.