जळगाव | राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाले असले तरी स्थानिक पातळीवर या तिन्ही पक्षातील नेत्यांमध्ये वाद होत असल्याचे चित्र अनेकदा दिसून आले होते अशातच आता जिल्हा परिषद आणि नगरपंचायतीवरून हे नेते पुन्हा तापले आहेत. याची सुरूवात झाली गिरीश महाजन यांच्या आघाडी बैठकीवरून आणि बोदवड नगरपंचायतीच्या निवडणुकीवरून हा वाद आता रोज वाढत चालला आहे याआधी गुलाबरावांनी खडसेंचा समाचार घेतला. त्यानंतर आता पुन्हा खडसेंनी बाळ एकाचे, बारसं दुसऱ्याचे, आणि डफडं गुलाबरावांचं म्हणत निशाणा साधला आहे. ते जळगावमध्ये माध्यमांशी बोलत होते.
गुलाबराव पाटील यांनी खडसेंना चारी मुंड्या चित करेल नाहीतर गुलाबराव नाव लावणार नाही, असं वक्तव्य केलं होतं यावर एकनाथ खडसे यांनी पलटवार करत गुलाबराव तुम्ही नाव लावूच नका. तुमच्या नावातील पहिलेच शब्द खराब आहेत, अशी टीका एकनाथ खडसे यांनी केली आहे.
आपले थोबाड खराब करू नका. माझे नाव एकनाथ हे संतांचं नाव आहे. त्यामुळे तोंडाला लावू नका, असा इशाराही खडसेंनी दिलाय. त्यामुळे हा वाद आता आणखी वाढताना दिसत आहे. गुलाबराव पाटील नशिराबाद येथे एका कार्यक्रमात बोलत असताना त्यांनी खडसे यांचे नाव न घेता खडसेंवर सडकून टीका केली आहे.