रिलायन्स २० लाख कर्मचाऱ्यांचे मोफत लसीकरण करणार |

 

 

नवी दिल्ली | देशात कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटने थैमान घातले होते, आता कोरोनाची लाट ओसरताना दिसत असून कोरोना रुग्णांची संख्याही कमी होत आहे. देशात कोरोना लसीकरणाच्या मोहीमेला आता वेग आला आहे. त्यातच कोरोनाला रोखण्यासाठी सामान्य नागरिकांनाही कोरोनाची लस टोचण्याची मोहिम देशात सुरू झाली आहे.

 

याच पार्श्वभूमीवर कंपन्यांकडूनही कर्मचाऱ्यांचे लसीकरण करण्यात येत आहे. रिलायन्सकडूनही 20 लाख कर्मचाऱ्यांचे लसीकरण करण्याची घोषणा करण्यात आली. रिलायन्स सोशल फाऊंडेशनच्या प्रमुख निता अंबानी यांनी रिलायन्सच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत रिलायन्स आणि रिलायन्सशी संबंधित सर्वच कंपन्यांतील कर्मचाऱ्याचे मोफत लसीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे.

 

रिलायन्समध्ये कार्यरत असलेले कर्मचारी, निवृत्त कर्मचाऱ्यांसह त्यांच्या कुटुंबातील सदस्यांचंही कंपनीकडूनच मोफत लसीकरण्यात करण्यात येईल, असे निता अंबानी यांनी जाहीर केले. भारतातील काही कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना मोफत कोरोनाची लस देण्याचा निर्णय घेतला. तसेच नीता अंबानी यांनी सर्व कर्मचाऱ्यांना या ईमेलद्वारे लसीकरण मोहिमेसाठी नोंदणी करण्याची विनंती केली आहे.

Team Global News Marathi: