आरसीबी संघाने केली नव्या वर्ल्ड चॅम्पियन परीक्षणाची घोषणा तर दोन दिग्गजांना संघाकडून नारळ

इंडियन प्रीमियर लीगमधील संघ रॉयल चॅलेंजर्स बँगलोर या संघाने पुढील सीझनसाठी तयारी सुरु केली आहे. एकदाही आयपीएलचे जेतेपद न पटकवलेल्या या संघाने आपल्या कोचिंग स्टाफमध्ये बदल केले आहेत. आरसीबीने संघ संचालक माईक हेसन आणि मुख्य प्रशिक्षक संजय बांगर यांचा कार्यकाळ न वाढवण्याचा निर्णय घेतला असून या दोघांची संघातून सुट्टी केली आहे. फ्रँचायझीने शुक्रवारी याबाबत माहिती दिली. यासह आरसीबीने पुढील सीझनसाठी नव्या प्रशिक्षकाची घोषणाही केली आहे.

आरसीबीने झिम्बाब्वेचे माजी क्रिकेटपटू आणि इंग्लंडचे माजी प्रशिक्षक अँडी फ्लॉवर यांची संघाचे नवे मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. अँडी फ्लॉवर यांनी याआधीही आयपीएलमध्ये प्रशिक्षकपद भूषवले आहे. फ्लॉवर यांनी बेंगळुरूपूर्वी लखनऊ सुपरजायंट्ससोबत काम केले आहे. लखनौला आयपीएलमध्ये केवळ दोन वर्षे झाली असून हा संघ बनवण्यात फ्लॉवर यांची महत्त्वाची भूमिका होती. फ्लॉवर यांच्या मार्गदर्शनाखाली लखनौने २०२२ आणि २०२३ या दोन्ही सलग वर्षांमध्ये प्लेऑफमध्ये प्रवेश केला. लखनौपूर्वी फ्लॉवर यांनी पंजाब किंग्जसोबतही काम केले आहे.

इंग्लंडला विश्वविजेते बनवले

इंग्लंड हा दोन टी-२० विश्वचषक जिंकणारा संघ आहे. या संघाने २०१० मध्ये पॉल कॉलिंगवुडच्या नेतृत्वाखाली पहिला टी-२० विश्वचषक जिंकला होता आणि त्यावेळी फ्लॉवर संघाचे मुख्य प्रशिक्षक होते. कोणत्याही फॉरमॅटमध्ये इंग्लंडचा हा पहिला विश्वचषक विजय ठरला. जेव्हा त्यांनी इंग्लंड संघ सोडला तेव्हा त्याने सांगितले की २०१० मध्ये संघासोबत टी-२० विश्वचषक जिंकणे हा इंग्लंड संघासोबत घालवलेल्या सर्वोत्तम क्षणांपैकी एक आहे. त्यांचे प्रशिक्षक पदाखाली इंग्लंडने २०१०-११ मध्ये घरच्या मैदानावर ऍशेस मालिकेत ऑस्ट्रेलियाला २-१ ने पराभूत केले आणि कसोटी मालिकेतही भारताचा पराभव केला.

आरसीबी होणार का चॅम्पियन?

आरसीबी संघ तीन वेळा आयपीएलच्या अंतिम फेरीत पोहोचला आहे, परंतु त्यांना एकदाही विजेतेपद मिळवता आले नाही. अँडी फ्लॉवर मुख्य प्रशिक्षक झाल्यानंतर आरसीबीचा विजेतेपदाचा दुष्काळ संपवण्याचा प्रयत्न करणार आहेत. फ्लॉवर यांनी यापूर्वी आयपीएलमध्ये काम केले आहे. याशिवाय त्यांनी जगातील इतर फ्रेंचायझी लीगमध्ये प्रशिक्षक म्हणून काम केले आहे. ते २०२० मध्ये कॅरेबियन प्रीमियर लीगमध्ये सेंट लुसिया झौक्ससोबत होता. २०२१ मध्ये पाकिस्तान सुपर लीगमध्ये ते मुलतान-सुलतान्ससोबत होता आणि येथून लखनऊच्या संघासोबत जोडले गेले. २०२३ मध्ये ते ILT20 लीगमध्ये गल्फ जायंट्सचे प्रशिक्षक होते

Team Global: