माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेतील नकारात्मक भूमिकेमुळे घराघरात पोहचलेली मालिकेतून शनायाच्या भूमिकेतून घराघरात पोहचलेली अभिनेत्री रसिका सुनीलने बॉयफ्रेंड आदित्य बिलागीसोबत लग्नगाठ बांधली आहे.या संदर्भातील माहिती तिने आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना दिलेली आहे.
गोव्याच्या किनाऱ्यावर मोजक्या लोकांच्या उपस्थितीत हा विवाह सोहळा पार पडला. रसिका आणि आदित्यने नुकतेच लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत त्यांच्या चाहत्यांना ही खुशखबर दिली आहे. या दोघांचे लग्न १८ ऑक्टोबरला पार पडले. मात्र त्यांनी ३० ऑक्टोबरला त्यांच्या लग्नाची बातमी आपल्या चाहत्यांना फोटो शेअर करून सांगितली आहे.
रसिका सुनील आणि आदित्य बिलागीने त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर सप्तपदी घेतानाचा फोटो शेअर केला आहे आणि लिहिले की, १८ ऑक्टोबर, २०२१, बीचवर रस्की-आदिचं लग्न. या फोटोवर त्यांच्या चाहत्यांसोबत सेलिब्रेटीदेखील शुभेच्छांचा वर्षाव करताना दिसत आहेत. तसेच अनेकांनी तिच्या नव्या वाटचालीस भभरून शुभेच्छा दिल्या आहेत.