मुंबईत निर्भया घटनेची पुनरावृत्ती करणारी संतापजनक घटना घडली आहे. ३० वर्षीय महिलेवर बलात्कार करुन आरोपींनी गुप्तांगात रॉड घुसवल्याचा अमानवीय आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे. या घटनेत तरुणी गंभीर जखमी झाली असून तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तत्पूर्वी सदर महिलेचा मृत्यू झाल्याची बातमी समोर येत आहे.
मुंबईतील साकीनाका परिसरात झालेल्या बलात्कार पीडित महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. या महिलेवर बलात्कार करुन तिच्या गुप्तांगात लोखंडी सळई घालण्याचा प्रकार घडला होता. या प्रकाराने मुंबई पुन्हा एकदा हादरुन गेली. या महिलेची प्रकृती गंभीर होती. तिच्यावर मुंबईतील राजावाडी रुग्णालयात उपचार सुरु होते. तिथेच तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी आरोपी मोहन चौहानला बेड्या ठोकल्या आहेत.
मात्र आता मोहन चौहान याला फाशी देण्याची मागणी संतप्त नागरिकांनी केलेली आहे. साकीनाका येथे बलात्कार झालेल्या महिलेचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यभरातून संताप व्यक्त होत आहे. हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी केली जात आहे.
मोहन चौहान या नराधमाने महिलेवर बलात्कार झाला होता. बलात्कारानंतर प्रचंड रक्तस्त्राव झाल्याने या महिलेचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर तिच्यावर राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, तीन दिवस सुरू असलेली तिची मृत्यूची झुंज अखेर अपयशी ठरली. महिलेचा मृत्यू झाल्यानंतर डीसीपी आणि एसपींनी तात्काळ राजावाडी पोलीस ठाण्यात धाव घेतली. राजावाडी पोलीस ठाण्याबाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.