राजस्थान रॉयल चा दिल्ली कॅपिटल वर दमदार विजय; वाचा सविस्तर-

मुंबई। इंडियन प्रीमीयर लीग २०२१ हंगामातील सातवा सामना गुरुवारी (१५ एप्रिल) राजस्थान रॉयल्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स संघात झाला. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात राजस्थान रॉयल्सने ३ विकेट्सने विजय मिळवला आहे. दिल्लीने राजस्थानला १४८ धावांचे आव्हान दिले होते. राजस्थानने हे आव्हान २ चेंडू बाकी ठेवत ७ विकेट्सच्या मोबदल्यात यशस्वी पूर्ण केले. राजस्थानच्या या विजयात डेव्हिड मिलर आणि ख्रिस मॉरिसने मोलाचा वाटा उचलला.

राजस्थानने १० षटकांच्या आतच ५ विकेट्स गमावल्यानंतर डेव्हिड मिलर आणि राहुल तेवातियाने राजस्थानचा डाव सावरला. त्यांनी ४८ धावांची भागीदारी केली. त्यामुळे राजस्थानने सामन्यात पुनरागमन केले. पण ही भागीदारी रंगत असतानाच तेवतियाला कागिसो रबाडाने १९ धावांवर बाद केले. त्यानंतर अर्धशतक केल्यानंतर काहीवेळात मिलरला आवेश खानने बाद केले. मिलरने ४३ चेंडूत ७ चौकार आणि २ षटकारांसह ६२ धावांची खेळी केली. त्याच्या या अर्धशतकामुळे राजस्थानच्या विजयाच्या आशा पल्लवित झाल्या होत्या.

त्याच्यानंतर ख्रिस मॉरिसने आक्रमक खेळत १८ चेंडूत ४ षटकारांसह नाबाद ३६ धावांची खेळी करत अखेर राजस्थानला विजय मिळवून दिला. मॉरिसला जयदेव उनाडकटने १ षटकारासह नाबाद ११ धावा करत चांगली साथ दिली.

 

दिल्लीकडून आवेश खानने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या. तसेच कागिसो रबाडा आणि ख्रिस वोक्सने प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या.

दिल्लीच्या १४८ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थान रॉयल्सची सुरुवात अतिशय निराशाजनक झाली होती. जोस बटलर, मनन वोहरा, कर्णधार संजू सॅमसन आणि शिवम दुबे स्वस्तात बाद झाले होते. अवघ्या ३६ धावांमध्ये राजस्थानने चार विकेट्स गमावल्या होत्या. त्यानंतर रियान पराग देखील अवघ्या दोन धावा करुन माघारी परतला होता. बेन स्टोक्सच्या जागी संघात संधी मिळालेल्या डेव्हिड मिलरनं संघाच्या धावसंख्येला सावरत ६२ धावांचं योगदान दिलं. मिलर बाद झाल्यानंतर राहुल तेवतिया (१९) आणि अखेरीस ख्रिस मॉरिसनं सामन्यावरचा संपूर्ण दबाव नाहीसा करत संघाला विजय प्राप्त करुन दिला.

 

ग्लोबल न्युज नेटवर्क: