डोंबिवली | डोंबिवलीच्या रेल्वे स्थानक हद्दीत एक प्रेमियुगल रोमान्स करत असताना एका व्यक्तीने आपल्या मोबाईल कॅमेऱ्यामध्ये हे दृश्य कैद केले होते. तर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसलाही याच प्रेमीयुगलाचा रोमान्स एकाने मोबाईलमध्ये कैद केला होता. स्थानकात अश्या प्रकारे रोमान्स केल्यामुळे एकच चर्चेला सुरवात झाली होती.
प्रेम करताना सार्वजनिक ठिकाणी आपण कसे वागत आहोत, याचे भान ठेवणे आवश्यक आहे. मात्र याचा विसर पडल्याने रेल्वे स्थानकातच खुल्लमखुल्ला रोमान्स करणाऱ्या त्या प्रेमीयुगलावर डोंबिवली लोहमार्ग पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल झाला आहे. तसेच त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न सुद्धा लोहमार्ग पोलीस करताना दिसून येत आहे.
7 मार्च रोजी डोंबिवलीच्या रेल्वे स्थानक हद्दीत एक प्रेमियुगल रोमान्स करत असताना एका व्यक्तीने आपल्या मोबाईलकॅमेऱ्यामध्ये हे दृश्य कैद केले होते. तर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसलाही याच प्रेमीयुगलाचा रोमान्स एकाने मोबाईलमध्ये कैद केला होता. त्यानंतर हा व्हिडिओ सामाजिक माध्यमांवर व्हायरल झाल्यावर प्रेमीयुगलांची नेटकऱ्यांमध्ये चांगलीच चर्चा सुरू झाली होती.