सिनेमा रिलीज होण्यापूर्वीच अभिनेता सलमान खानने एक व्हिडीओ शेअर करत पायरसीपासून दूर रहा आणि योग्य प्लॅटफॉर्मवर सिनेमा पहा अशी विनंती आपल्या सर्व चाहत्यांना केली होती तसेच सलमान खानाने आपल्या सर्व चाहत्यांकडून कमिंटमेंट मागितली होती. सलमान खानचा बहुप्रतिक्षित ‘राधे-युवर मोस्ट वॉन्टेड भाईजान’ हा सिनेमा १३ मे ला जगभरातील विविध सिनेमागृहांमध्ये तसेच OTT प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला आहे.
तसेच भारतात केवळ ३ चित्रपटगृहात हा सिनेमा प्रदर्शित झाला आहे. मात्र रिलीज झाल्यानंतर काही तासातच तो लीक झाला आहे. अनेक वेबसाईटवर राधे फ्रीमध्ये म्हणजेच मोफत पाहू शकतो तसेच डाउनलोडही करू शकतो. हा चित्रपट लीक झाल्यामुळे प्रोडक्शन कंपनीला मोठा तोटा सहन करावा लागणार आहे. सिनेमा रिलीज होण्यापूर्वीच सलमान खानने एक व्हिडीओ शेअर करत पायरसीपासून दूर रहा आणि योग्य प्लॅटफॉर्मवर सिनेमा पहा अशी विनंती केली होती.
यात त्याने चाहत्यांकडून कमिंटमेंट मागितली होती. तो म्हणाला होता, “एक सिनेमा पूर्ण करण्यासाठी अनेक लोक मेहनत करतात. खूप दु:ख होतं जेव्हा लोक पायरसी करून सिनेमा पाहतात. मी तुम्हा सर्वांकडून एक कमिटमेंट मागतो की योग्य प्लॅटफॉर्मवर योग्यरित्या सिनेमा एन्जॉय करा. तर ही आहे प्रेक्षकांची कमिटमेंट..नो पायरसी इन एंटरटेनमेंट” असं तो यात म्हणाला होता. मात्र यानंतरही चाहत्यांमी कमिंटमेंट तोडली आहे. हा सिनेमा काही बेकायदेशीर वेबसाईटवर लीक झाला आहे.