दक्षिण भारतातील नागरिकांना चित्रपटांचे प्रचंड वेड असून चित्रपट पाहणे हा त्यांचा छंद आहे. त्यामुळेच अनेक कलाकारांना प्रचंड पैसा मिळतो, तेथे वेगवेगळ्या प्रकारचे चित्रपट अनेक महिने चांगला पैसा कमावतात. दक्षिण भारतीय सुपरस्टार अल्लू अर्जुनचा नवीन चित्रपट पुष्पा सध्या चर्चेत आहे. अल्लू अर्जुनने पुन्हा एकदा आपल्या दमदार अभिनयाने आणि धमाकेदार अॅक्शनने चाहत्यांना प्रभावित केले. कारण अल्लूचा अभिनय उत्कृष्ट आहे पण त्याची शैलीही अप्रतिम आहे.
अभिनेता चिरंजीवीचा तो पुतण्या असून रामचरण तेजाचा चुलत भाऊ आहे. अल्लू अर्जुन त्याच्या चित्रपटातून करोडोंची कमाई करतो. तो दक्षिण भारतीय चित्रपटांमध्ये सर्वाधिक मानधन घेणाऱ्या कलाकारांपैकी एक आहे. अल्लूची जीवनशैलीही कोणा राजा महाराजांपेक्षा कमी नाही. त्याचे आलिशान घर आणि करोडोच्या गाड्या अल्लू अर्जुनच्या लक्झरी लाइफचे प्रदर्शन करतात. दक्षिण भारतीय अभिनेता अल्लू अर्जुनची नेट वर्थ, कमाई, कार कलेक्शन प्रचंड आहे.
एका रिपोर्ट्सनुसार, अभिनेता अल्लू अर्जुनची एकूण संपत्ती ३५० कोटी रुपये आहे. अल्लू अर्जुनची वार्षिक कमाई ३२ कोटींहून अधिक आहे. अल्लू अर्जुनचे हैदराबादमध्ये आलिशान घर आहे. याशिवाय ८०० जुबिली नावाचे कार्यालय आणि नाईट क्लब देखील आहे. अल्लू अर्जुन एका चित्रपटासाठी १५ कोटी रुपये घेत असला तरी त्याच्या मागील ‘अला वैकुंठपुरमलो’ या चित्रपटासाठी अल्लू अर्जुनने २५ कोटी रुपये घेतले होते. त्याचबरोबर पुष्पा या चित्रपटासाठीही त्याने तेवढीच रक्कम घेतली आहे.