पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी राज्यातील वातावरण चांगले तापू लागले आहे. त्यात या प्रकरणी शिवसेना नेते आणि वनमंत्री संजय राठोड यांचे नाव आल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. मात्र राठोड यांच्यावर लावण्यात आलेले आरोप फेटाळले होते. मात्र भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी या प्रकरणी राठोड यांचावर बेछूड आरोप लगावले आहेत.
भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी आज पुण्याचा दौरा करत ज्या इमारतीवरून पूजा चव्हाणने उडी मारत जीवन संपवलं त्या इमारतीची पाहणी केली. यानंतर, त्यांनी थेट वानवडी पोलीस ठाण्यात दाखल होत सदर प्रकरणाच्या चौकशी बाबत पोलिसांना विचारणा केली. पुणे पोलिसांची भूमिका ही संदिग्ध असून ज्याप्रमाणे वरिष्ठ अधिकारी उत्तरे देत आहेत त्यावरून साफ समजतय की ते अत्यंत दबावात आहेत, असा आरोप त्यांनी केला.
दरम्यान, त्यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेत यावर सविस्तर भाष्य केलं. दरम्यान, यवतमाळमधील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात सौ.पूजा अरूण राठोड नावाच्या महिलेची गर्भपात झाल्याची नोंद आहे. गर्भपात करणाऱ्या महिलेचे नाव सौ. पूजा अरुण राठोड आणि वय २२ वर्ष दाखवण्यात आले. त्यामुळे संशय वाढला आहे. पूजा चव्हाणने बनावट नाव सौ पूजा राठोड धारण करून गर्भपात केला असा प्रश्न यानिमित्त उपस्थित होत आहे.