काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी उद्धव ठाकरे लोकप्रिय मुख्यमंत्री आहेत. त्यांना पंतप्रधान करा, असा विधान पुणे येथे पत्रकार परिषदेमध्ये बोलताना केले होते. मात्र त्यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चेला सुरवात झाली होती. आता या विधानावरून भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी टोला लगावला आहे.
काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी उद्धव ठाकरे लोकप्रिय मुख्यमंत्री आहेत. त्यांना पंतप्रधान करा, असं म्हटलं होतंपृथ्वीबाबांचं ते वक्तव्य स्तुतीपर होतं की…?, असा खोचक सवाल करतानाच असं विधान करून त्यांनी मुख्यमंत्र्यांची हेटाळणीच केली, असा टोला चंद्रकांत पाटील यांनी लगावला आहे.
भाजपच्या ओबीसी मोर्चा प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीला संबोधित करताना चंद्रकांत पाटील यांनी थेट छगन भुजबळ यांनाच आव्हान दिलं. छगन भुजबळ आणि विजय वडेट्टीवार हे सरकारमधील दोन मंत्री लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचं काम करत आहेत. ओबीसी आरक्षणाबद्दल भाजपच्या मनात खोट नाही. छगन भुजबळ यांनी ओबीसी आरक्षणावर कोल्हापूरच्या बिंदू चौकात येऊन देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करावी. म्हणजे दूध का दूध आणि पानी का पानी होईल, असं पाटील म्हणाले.