देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतला लसीचा दुसरा डोस !

 

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी एम्स रुग्णालयात लसीचा दुसरा डोस टोचून घेतला आहे. या संदर्भातील माहिती त्यांनी आपल्या अधिकृत ट्विट अकाउंट वरून दिलेली आहे. तसेच लस घेतल्याचे छायाचित्र त्यांनी ट्विटरवरून शेअर केले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या ट्विटमध्ये म्हणतात की, मी एम्स रुग्णालयात जाऊन कोव्हिड लसीचा दुसरा डोस घेतला. कोरोना विषाणूवर मात करण्यासाठी उपलब्ध असलेल्या मोजक्या मार्गांपैकी लस हा एक मार्ग आहे. तुम्ही लसीकरणासाठी पात्र असाल तर तात्काळ लस घेऊन टाका, असा संदेश पंतप्रधान मोदी यांनी दिला.

पंतप्रधान मोदी यांनी कोरोना लसीची पहिला डोस १ मार्चला घेतला होता. त्यांनी स्वदेशी बनावटीची कोव्हॅक्सिन ही लस टोचून घेतली होती. तसेच राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि खासदार शरद पवारांनी सुद्धा काल घरीच कोरोना लसीचा दुसरा डोस टोचून घेतला होता.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वदेशी बनावटीच्या भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सीन लसीचे दोन डोस घेतले आहेत. सुरुवातीच्या टप्प्यात कोव्हॅक्सीनच्या सुरक्षिततेविषयी अनेकांना साशंकता होती. लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात अनेक आरोग्य कर्मचाऱ्यांनी कोव्हॅक्सीन ही देशी लस घेण्यास नकार दिला होता. त्यामुळे मोठा पेच निर्माण झाला होता. मात्र, आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वत: कोव्हॅक्सीन टोचून घेतल्याने या लसीविषयीची शंका बऱ्याच प्रमाणात दूर झाली आहे.

Team Global News Marathi: