पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून भेटीसाठी वेळ मिळत नाही, छत्रपती संभाजीराजेंनी व्यक्त केली खंत

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून भेटीसाठी वेळ मिळत नाही, छत्रपती संभाजीराजेंनी व्यक्त केली खंत

ग्लोबल न्यूज:राज्यात मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून राजकारण तापू लागलेले असताना, या विषयावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेटण्यासाठी खासदार छत्रपती संभाजी राजेंनी वेळ मागितली होती. या संदर्भात संभाजी राजेंनी पंतप्रधान कार्यालयाबरोबर पत्रव्यवहार सुद्धा केले होते मात्र अद्याप पंतप्रधान कार्यलयाकडून भेटण्यासाठी वेळ देण्यात आलेली नाही.

या संदर्भात बोलताना संभाजीराजे म्हणाले की, मराठा आरक्षणाविषयी पंतप्रधान मोदी यांच्याकडून अजूनही भेटीची वेळ मिळालेली नाही. ते वेळ देण्याची आजही आपण प्रतीक्षा करत आहोत,” अशी खंत खासदार संभाजीराजे भोसले यांनी व्यक्त केली. औरंगाबाद शहराचे संभाजी महाराज यांच्या नावाने नामकरण होत असेल, तर त्याचे स्वागत करायला हवे. नामकरणाच्या निर्णयास आपले समर्थन आहे,” असं संभाजीराजे यांनी स्पष्ट केलं.

मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. त्यामुळे राज्यातील भरती प्रक्रिया आणि शैक्षणिक प्रवेशाचा प्रश्न निर्माण झाला. राज्य सरकारने पुन्हा सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, सर्वोच्च न्यायालयानं आरक्षणावरील स्थगिती कायम ठेवली होती. त्यामुळे राज्य सरकारने ईडब्लूएस आरक्षणाचा लाभ देण्याचा निर्णय घेतला. मात्र, त्यामुळे मराठा आरक्षणाला धोका पोहचणार असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

ग्लोबल न्युज नेटवर्क: