नवी दिल्ली | – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना काळे झेंडे दाखवणाऱ्या काँग्रेस महिला नेत्यावरील हल्ल्याबाबत पोलिसांनी खुलासा केला आहे. काँग्रेसच्या महिला नेत्याने स्वत:वरच गोळी झाडल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे. रिता यादव असं या महिला नेत्याचं नाव आहे. पक्षात स्वत:चं महत्व वाढवण्यासाठी रिता यादवनं हे षडयंत्र रचल्याचं समोर आलं आहे. पक्षात राजकीय वजन वाढवण्यासाठी रिता यादवने हे कृत्य केले.
सुल्तानपूर येथे १६ डिसेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी पूर्वांचल एक्सप्रेस वेचं लोकार्पण करण्यासाठी पोहचले होते. त्या कार्यक्रमावेळी पंतप्रधान मोदींच्या जनसभेत रिता यादव यांनी काळे झेंडे दाखवत योगी मुर्दाबादच्या घोषणा दिल्या होत्या. पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमात काळे झेंडे दाखवले म्हणून रिता यादव प्रसिद्धीझोतात आली.
थेट मोदींना विरोध केल्यामुळे रिटा यादव सगळीकडे बातम्यामध्ये झळकू लागल्या. त्यानंतर ३ जानेवारीला रिता यादवनं पोलीस ठाण्यात धाव घेत तिच्यावर अज्ञातांनी जीवघेणा हल्ला केल्याचा आरोप केला. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केला असता त्यातून खळबळजनक खुलासा बाहेर आला. यादव यांनी स्वतःवर गोळी झाडून घेतल्याचा आरोप तिच्यावर करण्यात आला होता.