माध्यमांची गळचेपी करणाऱय़ा नेत्यांच्या यादीत पंतप्रधान मोदींचे नाव |

 

 

नवी दिल्ली | विदाऊट बॉर्डर्स या संस्थेन माध्यमांची गळचेपी करणाऱय़ा नेत्यांची यादी जाहीर केली असून या यादीत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाचा समावेश आहे. मोदी यांच्यासह उत्तर कोरियाचे हुकुमशहा किम जोंग उन, पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान तसेच चीनचे राष्ट्राध्यक्श शी जिनपिंग यांची नावे या यादीत नमूद करण्यात आली आहे. 

 

 रि पोर्टर्स विदाऊट बॉर्डर ही संस्था कार्यरत आहे. दर पाच वर्षांनी ही संस्था माध्यमांची गळचेपी करणाऱय़ा नेत्यांची यादी जाहीर करते. सोमवारी या संस्थेने एक नवीन यादी जाहीर केली आहे. त्यात माध्यमांची गळचेपी करणाऱय़ा जगभरातील ३७ नेत्यांची नावे नमूद करण्यात आली आहेत. 

 

या नेत्यांनी फक्त माध्यमांची गळचेपी नव्हे तर पत्रकारांना विनाकारण तुरुंगात डांबण्याचाही आरोप आहे. १९ देशात पत्रकारांची आणि अभिव्यक्ती स्वांतत्र्यांची स्थिती गंभीर असल्याचे अहवालात म्हटले आहे. तर १६ देशांमध्ये ही स्थिती अतिगंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान, उत्तर कोरियाचे हुकुमशहा किम जोंग उन, सौदी अरेबियाचे क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमार, ब्राझीलचे राष्ट्रपती जैर बोलसेनारो, बांग्लादेशच्या पंतप्रधान शेख हसीना आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादीमिर पुतिन यांच्या नावाचाही समावेश आहे.

Team Global News Marathi: