पंतप्रधान मोदींना इतिहासाचे फारसे ज्ञान नाही, भाषणातील त्यांनी ‘या’ चुकीसाठी देशाची माफी मागावी

 

नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशातील तमाम नागरिकांना ७५ व्या स्वतंत्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. यावेळी आपल्या तासभराच्या भाषणात देशातील स्वातंत्र्य सैनिकांच्या कार्याची आठवण करुन दिली. दरम्यान, त्यांनी आपल्या भाषणात एक चूक केली असल्याचा दावा मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस कडून करण्यात आला आहे. त्यासाठी मोदींनी देशाची माफी मागावी अशी मागणी देखील तृणमूल काँग्रेसने केली आहे.

आपल्या भाषणादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वातंत्र्य सेनानी मातंगिनी हाजरा या आसामच्या असल्याचा उल्लेख केला होता. मातंगिनी हाजरा या पश्चिम बंगालच्या मेदिनापूर येथील आहे. पंतप्रधान मोदींना इतिहासाचे फारसे ज्ञान नाही आणि त्यांनी या चुकीच्या उल्लेखाबाबत माफी मागितली पाहिजे असे तृणमूलने म्हटले आहे.

पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर तृणमूलने पंतप्रधान नरेंद्र मोदींना इतिहासाचे फारसे ज्ञान नाही आणि त्यांनी बंगालचे स्वातंत्र्य सेनानी मातंगिनी हाजराचे आसामचे रहिवासी म्हणून वर्णन केल्याबद्दल माफी मागितली पाहिजे असे म्हटले आहे. त्याचवेळी तृणमूल स्वातंत्र्यदिनी पंतप्रधानांच्या भाषणादरम्यान झालेल्या चुकीबद्दल अनावश्यक वाद निर्माण करत असल्याचे भाजपाने म्हटले आहे.

 

 

Team Global News Marathi: