उद्धव ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडी यांची येणाऱ्या मुंबई महानगर पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर युती झाली असून प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरे यांनी आगामी निवडणुका लक्षात घेऊन केलेल्या युतीची सध्या राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा आहे. प्रहारचे नेते बच्चू कडू यांनी देखील या नव्या राजकीय समीकरणाबाबत भाष्य केले आहे.प्रकाश आंबेडकरांनी काल पंतप्रधान मोदींच्या कामाचे कौतुक केले तसेच आंबेडकरांनी तपास यंत्रणांकडून होत असलेल्या कारवाईचे समर्थन केले असल्याची माहिती देखील यावेळी कडूंनी यावेळी दिली.
प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरे यांची युती सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी जी कारवाई करतात ती योग्य असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी म्हंटल आहे. प्रकाशजी खरे बोलले आहे. त्यांची भाजपसोबत युती होऊ शकते असं सूचक विधान बच्चू कडू यांनी केलं आहे. माध्यमांशी बोलताना बच्चू कडू यांनी हे विधान करत वंचित आणि भाजपा युतीसंदर्भात भाष्य केले आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कामाबाबत देखील बच्चू कडू यावेळी बोलले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रचंड काम करतात. रात्री दोन वाजता गेलो तरी ते भेटतात असं म्हणत बच्चू कडूंनी मुख्यमंत्र्यांचं कौतुक केलं आहे. तसेच हिरा कभी भी चमकता है असंही बच्चू कडू यावेळी म्हणाले आहेत