Sunday, August 7, 2022
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
No Result
View All Result
ADVERTISEMENT

झेडपी , पंचायत समिती सह महापालिका निवडणूक प्रक्रियेला स्थगिती –

by ग्लोबल न्युज नेटवर्क
August 5, 2022
in महाराष्ट्र
0
झेडपी , पंचायत समिती सह महापालिका निवडणूक प्रक्रियेला स्थगिती –
ADVERTISEMENT

जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणूक प्रक्रियेला स्थगिती –

राज्य निवडणूक आयोगाची मोठी घोषणा

राज्य शासनाने महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम, १९६१ मध्ये केलेल्या दुरूस्तीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद व पंचायत समित्यांची निवडणूक प्रक्रिया राज्य निवडणूक आयोगाकडून आज स्थगित करण्यात आली. आता यथावकाश पुढील आदेश देण्यात येतील राज्य निवडणूक आयोगाने जिल्हाधिकाऱ्यांना कळविले आहे

DK Technos is Best IT Company In Solapur DK Technos is Best IT Company In Solapur DK Technos is Best IT Company In Solapur
ADVERTISEMENT

रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, जळगाव, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, बीड, नांदेड, उस्मानाबाद, लातूर, अमरावती, बुलढाणा, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर व गडचिरोली या जिल्ह्यात निवडणुका होणार आहेत. या सर्व जिल्हाधिकाऱ्यांना राज्य निवडणूक आयोगाने जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणूक प्रक्रियेला स्थगिती दिल्याची माहिती दिली आहे.

ADVERTISEMENT

राज्य शासनाने महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम, १९६१ मध्ये केलेल्या बदलासंदर्भातील अध्यादेश ४ ऑगस्ट २०२२ रोजी प्रसिद्ध झाला आहे. त्यानुसार जिल्हा परिषदेच्या सदस्यपदांच्या जागांच्या संख्येत बदल करण्यात आला असून, सध्याची मतदार विभाग आणि निर्वाचक गणांची रचना; तसेच आरक्षणाची प्रक्रियादेखील स्थगित करण्यात आली आहे. त्यामुळे राज्य निवडणूक आयोगाकडे सध्या सुरू असलेली निवडणूक प्रक्रिया स्थगित करण्यात आलेली आहे.

ADVERTISEMENT

सध्या २५ जिल्हा परिषदा व त्यांतर्गतच्या २८४ पंचायत समित्यांच्या आरक्षणाची अंतिम अधिसूचना आज (ता. ५ ऑगस्ट) रोजी प्रसिद्ध करण्यात येणार होती. त्याचबरोबर १३ जिल्हा परिषदा व त्यांतर्गतच्या पंचायत समित्यांची केंद्रनिहाय मतदार यादी ८ ऑगस्ट २०२२ रोजी; तर १२ जिल्हा परिषदा व त्यांच्यातर्गतच्या पंचायत समित्यांची प्रारूप मतदार यादी १० ऑगस्ट २०२२ रोजी प्रसिद्ध करण्यात येणार होती. आता ही सर्व प्रक्रिया आहे त्या स्तरावर स्थगित करण्यात आली असून, यथावकाश पुढील आदेश देण्यात येतील राज्य निवडणूक आयोगाने जिल्हाधिकाऱ्यांना कळविले आहे.

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window)
  • Click to share on Twitter (Opens in new window)
  • Click to share on WhatsApp (Opens in new window)
Tags: झेडपीनिवडणूक स्थगितीपंचायत समितीमहापालिका
Tech Drift Solutions Tech Drift Solutions Tech Drift Solutions
ADVERTISEMENT
Previous Post

औरंगाबादेत शिवसेनेला जोरदार धक्का १५ पैकी १२ ग्रामपंचायतींवर शिंदे गटाचे वर्चस्व

Next Post

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आज पासून दोन दिवसीय दिल्ली दौऱ्यावर

Next Post
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आज पासून दोन दिवसीय दिल्ली दौऱ्यावर

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आज पासून दोन दिवसीय दिल्ली दौऱ्यावर

Recent Posts

  • भंडाऱ्याच्या ३५ वर्षीय महिलेवर सामूहिक अत्याचार करणाऱ्या नराधमांना कडक शिक्षा करून पीडितेला न्याय द्या – मनीषा कायंदे.
  • महाराष्ट्रात रहायचं तर थोर महापुरुषांची नावे घ्यावीच लागतील, अन्यथा राज्याबाहेर हाकला – संभाजीराजे
  • मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठींब्यासाठी क्रांती दिनी शिवसेनेची क्रांती रॅली.
  • मिसेस अमृता फडणवीसांवर किशोरी पेडणेकरांनी गायलं गाणं
  • “शिंदे गटाचे खासदार निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार”; देवेंद्र फडणवीस

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र

Website maintained by Tushar Bhambare.

WhatsApp Group