सध्या संपूर्ण देशात कोरोनाने हाहाकार माजवला आहे. त्यात आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण पडला आहे. याच पार्श्वभूमीवर दिल्लीतील परिस्थिती अतिशय चिंताजनक बनत चालली आहे. आज अनेक सेलिब्रिटी, राजकीय पुढारी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांना आपला प्राण गमवावा लागला आहे. त्यात चित्रपट सृष्ठीतीत आणखी एका अभिनेत्याचं कोरोनामुळे निधन झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, टी नरसिम्हा राओ ज्यांना टीएनआर नावाने ओळखले जातात. त्यांचं कोरोनामुळे निधन झालं आहे.
TNR लोकप्रिय असलेले अभिनेता आणि एँकरला हैदराबादमध्ये मलकजगिरी रूग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यावेळी त्यांची तब्बेत गंभीर असल्याचं म्हटलं गेलं. काही दिवसांपूर्वी त्यांना कोरोनाची लागण झाली होती. तसेच त्यांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्यांची प्रनजोत मालवली आहे. टीएनआर लवकरच अनिल रविपुडी यांच्या सिनेमात दिसणार होते.
देशभरात आलेल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे वाढणाऱ्या रुग्ण संख्येला ब्रेक लावण्याचा प्रयत्न सर्वत्र केला जात आहे. या दुसर्या लाटेमुळे, देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणार्या मुंबईचा सर्वात जास्त कोरोना केसेस असलेल्या शहरांमध्ये समावेश झाला आहे. परंतु गेल्या काही दिवसांपासून येथे संसर्गाची गती नियंत्रित आणली गेली आहे.