Thursday, June 8, 2023
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पोलिसांच्या धाडीत 5 कोटींचे तब्बल 10 किलो सोने सापडले, ​​​​​​​राजस्थानच्या तिघांना घेतले ताब्यात

by ग्लोबल न्युज नेटवर्क
March 6, 2022
in राजकारण
0
पोलिसांच्या धाडीत 5 कोटींचे तब्बल 10 किलो सोने सापडले, ​​​​​​​राजस्थानच्या तिघांना घेतले ताब्यात

अमरावती ते बडनेरा मार्गावरील दसरा मैदान परिसरातील एका अपार्टमेंटमधील फ्लॅटमध्ये राजापेठ पोलिसांनी धाड टाकली. यावेळी पोलिसांनी फ्लॅटमधून तब्बल 10 किलो 238 ग्रॅम सोन्याचे दागिने व बिस्कीट तसेच 5 लाख 5 हजारांची रोख असा एकूण 5 कोटी 5 लाखांचा ऐवज जप्त केला आहे. पोलिसांनी संशयाच्या आधारे तिघांवर कारवाई करुन दोघांना अटक केली आहे.

कोट्यवधींचा सोन्याचा ‘खजिना’ जप्त

सोन्याबाबत कोणत्याही प्रकारचे कागदपत्र किंवा बिल संशयितांनी पोलिसांकडे सादर केले नसल्यामुळे पोलिसांनी हा कोट्यवधी रुपयांचा सोन्याचा ‘खजिना’ जप्त केला आहे. ही कारवाई शनिवारी रात्रीपासून रविवारी (दि. 6) सकाळपर्यंत सुरू होती. एकाचवेळी इतक्या मोठ्या प्रमाणात सोनं आढळल्यामुळे शहरात खळबळ उडाली आहे.

राजेन्द्रसिंग भवरसिंग राव (38, रा. सेवाली, ता. राजसमंध, राजस्थान), गिरीराज जगदिशचंद्र सोनी (22, रा. वल्लभनगर, उदयपूर, राजस्थान) आणि अशोक सत्यनारायण खंडेलवाल (24, रा. गंगापूर, भिलवाडा, राजस्थान, तिघेही रा. ह. मु. फ्लॅट क्रमांक 401, राधाक्रिष्ण अपार्टमेंट, दसरा मैदानासमोर, अमरावती) यांच्याविरुध्द पोलिसांनी कारवाई केली असून राजेन्द्रसिंग राव व गिरीराज सोनी या दोघांना अटक केली तर अशोक खंडेलवालची प्रकृती ठिक नसल्यामुळे त्याला रुग्णालयात दाखल केले आहे.

कारवाईमुळे संपुर्ण शहरात खळबळ

राजापेठच्या डिबी पथकाला या फ्लॅटमध्ये मोठ्या प्रमाणात सोने असल्याची माहीती मिळाली होती. त्या माहीतीच्या आधारे राजापेठचे ठाणेदार मनिष ठाकरे, राजापेठचे पोलिस निरीक्षक सुरेन्द्र अहेरकर व त्यांच्या पथकाने शनिवारी (दि. 5) रात्री 10 वाजताच्या सुमारास धाड टाकली. यावेळी पोलिसांना फ्लॅटमध्ये मोठ्या प्रमाणात सोन्याचा साठा मिळाला.

प्रथमदर्शनी हे सोने पाहून पोलिसांचेही डोळे विस्फारले. पोलिसांनी धाड टाकली, त्यावेळी हे तिघेही हजर होते. पोलिसांनी तिघांचीही विचारपूस केली असता आमचा वैध व्यवसाय असून आम्ही मुंबईतून सोने आणतो आणि त्याचे दागिने बनवून स्थानिक काही सुवर्ण व्यावसायिकांना विक्री करतो. मात्र या व्यवसायासंदर्भातील पक्के बिल किंवा संबधित परवाना त्यांच्याकडे मिळाला नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

त्यांच्याकडे जीएसटी रजिस्ट्रेशन व अनेक कच्चे बिल दिसलीत, मात्र पोलिसांनी त्यांना सबळ कागदपत्र सादर करण्याबाबत सांगितले असता ते आमच्या ‘सीए’कडे मुंबईत असल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले. खात्री होईल, असे कोणतेही कागदपत्र सोन्यासंदर्भात सादर न केल्यामुळे आम्ही संशयाच्या आधारे तिघांविरुध्द कलम 41 (ड) अन्वये कारवाई केली आहे. तसेच फ्लॅटवर असलेले सोनं खर कि खोट याबाबत सुवर्णकाराडून तपासणी करुन घेतली आणि संपुर्ण सोेनं जप्त केले आहे. या कारवाईमुळे संपुर्ण शहरात खळबळ उडाली आहे.

जप्त केलेल्या सोन्यांमध्ये बिस्कीट व तयार दागिन्यांचा समावेश

पोलिसांनी जप्त केलेल्या सोन्यांमध्ये बिस्कीट व तयार दागिन्यांचा समावेश आहे. यामध्ये सुमारे सव्वानऊ किलो वजनाचे तयार दागिने तर अर्धा किलोचे बिस्कीट असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

आयकर विभागाला माहीती दिली

सबळ कागदपत्र किंवा सोने खरेदी विक्री व्यवहाराचे बिलं आम्हाला संबधितांनी सादर केले नाही. त्यामुळे संशयाच्या आधारे आम्ही 10 किलो 238.900 ग्रॅम सोने तसेच रोख जप्त केली आहे. या प्रकरणाची माहीती तत्काळ आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आली आहे. मनिष ठाकरे, ठाणेदार, राजापेठ पोलिस ठाणे, अमरावती.

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window)
  • Click to share on Twitter (Opens in new window)
  • Click to share on WhatsApp (Opens in new window)
Tags: अमरावतीसोने जप्त
ADVERTISEMENT
Next Post
‘हिमालयन योगी’ घोटाळा:  राष्ट्रीय शेअर बाजाराच्या माजी प्रमुख चित्रा रामकृष्ण यांना अटक

'हिमालयन योगी' घोटाळा: राष्ट्रीय शेअर बाजाराच्या माजी प्रमुख चित्रा रामकृष्ण यांना अटक

Recent Posts

  • राशिभविष्य : जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस तुमच्यासाठी
  • पंडित नेहरू नंतर नरेंद मोदींच्या हातात येणार राजदंड
  • राशिभविष्य : जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस तुमच्यासाठी
  • युवकांचे आत्महत्येचे प्रमाण चिंताजनक….
  • राशिभविष्य: जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस तुमच्यासाठी

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र

Website maintained by Tushar Bhambare.

WhatsApp Group