पोलीस आयुक्तालयाचा पोलीस कर्मचारीच निघाला गांजाचा तस्कर

 

मुंबई | मीरा भाईंदर – वसई विरार पोलीस आयुक्तालयातील पोलीस कर्मचारी असलेला साजिद फारूक पठाण हाच गांजा ह्या अमली पदार्थांचा तस्कर निघाला आहे. छत्तीसगढ पोलिसांनी ओडिसा सीमेवर पठाण सह वसई – नालासोपारा भागातील ६ जणांना अटक करून १५० किलो गांजा जप्त केला आहे या घटनेमुळे पोलीस खात्यात एकच खळबळ उडाली आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार ओडिसा मधून मोठ्या प्रमाणात मुंबई , ठाणे , पालघर सह अनेक भागात गांजा ह्या अमली पदार्थांची तस्करी छत्तीसगढ मार्गे केली जाते. बस्तर जिल्ह्यातील नगरनार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बुधराम नाग ह्यांना खबऱ्याकडून माहिती मिळाली होती.

सदर गांजा ओडिसा मधून मुंबईच्या दिशेने काही तस्कर जाणार आहेत . त्या अनुषंगाने त्यांनी सीमेवर धनपुंजी फॉरेस्ट नाका येथे ४ फेब्रुवारी रोजी बुधराम नाग व पोलीस पथकाने संशयित इनोव्हा गाडी अडवली . तपासणीत १६ गोणीत भरून असलेला गांजा ह्या अमली पदार्थाचा साठा सापडला . ओडिसा मधून आणलेला गांजा पालघर जिल्ह्यातील नालासोपारा भागात नेला जात होता.

साजिद हा मुख्यालयातील कर्मचारी असला तरी खानिवडा येथे चेकपोस्ट वर तैनात होता . त्याच्यावर कारवाई केली जाणार असून एका पोलीस अधिकाऱ्यास नगरनार पोलीस ठाण्यात गुन्ह्याची माहिती घेण्यासाठी रवाना केले गेले आहे . तर वसई – विरार सह मीरा भाईंदर व परिसरात गांजा आणणारे हे तस्कर नालासोपारा – वसई भागातील असल्याचे समोर आले आहे .

Team Global News Marathi: