सलग तिसऱ्या दिवशी पेट्रोलच्या दरात वाढ; सणासुदीच्या दिवसात नागरिकांच्या खिशाला कात्री

मुंबई  : ऐन सणासुदीच्या काळात महागाईत वाढ झाली आहे. पेट्रोलियम कंपन्यानी शनिवारी पेट्रोल दरात वाढ केली. सलग तिसऱ्या दिवशी देशात पेट्रोल १६ पैशांनी वाढले आहे. त्यामुळे ग्राहकांना पेट्रोल खरेदीसाठी जादा पैसे मोजावे लागणार आहेत.

कंपन्यांनी शनिवारी पुन्हा एकदा पेट्रोल दरात १४ ते १६ पैशांची वाढ केली. याआधी गुरुवार आणि शुक्रवारी पेट्रोलियम कंपन्यांनी पेट्रोलचा दर वाढवला होता. त्यामुळे मुंबईत पेट्रोलचा भाव ८८.०२ रुपये असून डिझेलचा भाव प्रती लिटर ८०.११ रुपयांवर कायम आहे.

जवळपास २२ दिवस डिझेलचा भाव स्थिर आहे. दिल्लीत पेट्रोल ८१.३५ रुपये असून डिझेलचा भाव ७३.५६ रुपयांवर कायम आहे. चेन्नईत पेट्रोल ८४.४० रुपये असून डिझेल ७८.८६ रुपये आहे. तर कोलकात्यात पेट्रोल ८२.८७ रुपये आहे. तर डिझेल ७७.०६ रुपये प्रती लिटर इतका आहे.

ग्लोबल न्युज नेटवर्क: