Paytm IPO | गुंतवणूकदारांची उत्सुकता संपली; या तारखेला खुला होणार पेटीएमचा आयपीओ

Paytm IPO | गुंतवणूकदारांची उत्सुकता संपली; या तारखेला खुला होणार पेटीएमचा आयपीओ

मुंबई : डिजिटल पेमेंट कंपनी पेटीएम(Paytm)च्या आयपीओची अनेक गुंतवणूकदार वाट पाहत होते. हा आयपीओ 18300 कोटींचा असणार आहे. सब्सस्क्रीप्शनसाठी 8 नोव्हेंबर पासून खुला असणार आहे. पेटीएमने आपल्या आयपीओसाठी प्राइज बॅंड निश्चित केला आहे. बीएसईवर फाइलिंगमध्ये देण्यात आलेल्या माहितीनुसार इश्युसाठी प्राइज बॅंड 2080-2150 रुपये असणार आहे. भारतीय बाजारात हा आतापर्यंतचा सर्वात मोठा आयपीओ असणार आहे. या आधी सरकारी कंपनी कोल इंडिया 15 हजार कोटींचा आयपीओ आणला होता.

कंपनीचा इश्यू साइज

पेटीएमने आपल्या आयपीओची साइज वाढवत 18300 कोटी रुपये इतकी केली आहे. पेटीएम आयपीओच्या माध्यमातून 16 हजार 600 कोटी रुपये उभारण्याचे नियोजन होते. ज्यामध्ये 8300 कोटींचा फ्रेश इक्विटी शेअर आणि 8300 कोटी कोटींचा ऑफर फॉर सेल  (OFC)असणार आहे. ओएफएसचा साधारण 50 टक्के भाग एंट फायनांशिएल आणि इतर अलीबाबा, एलिवेशन कॅपिटल, सॉफ्टबँक आणि इतर शेअरधारकांच्या वतीने आहे.

बुक रनिंग लीड मॅनेजर्स

या आयपीओसाठी  Morgan Stanley India Company Private Ltd, Goldman Sachs (India) Securities Private Ltd, Axis Capital, ICICI Securities, HDFC Bank, JP Morgan India Private Ltd आणि Citigroup Global Markets India Private Ltd बुक रनिंग लीड मॅनेजर्स आहेत.

कमीत कमी गुंतवणूक

या इश्यूमध्ये गुंतवणूकदारांना कमीत कमी 6 इक्विटी शेअर्समध्ये गुंतवणूक करावी लागेल. अप्पर प्राइज बॅंड 2150 रुपयांच्या हिशोबाने कमीत कमी 12900 रुपयांची गुंतवणूक गरजेची असणार आहे. या आयपीओमध्ये 75 टक्के भाग हा संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी, 10 टक्के रिटेल गुंतवणूकदार तसेच 15 टक्के हिस्सा नॉन इंस्टिट्युशनल इन्वेस्टर साठी रिझर्व असणार आहे.

 

ग्लोबल न्युज नेटवर्क: