नगर | नगरमध्ये पवार आणि विखे कुटुंबियांचे वाद सर्वश्रुत आहे याच वादामुळे विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा देऊन रदकृष्ण विखे पाटील यांनी भाजपात प्रवेश केला होता गुरुवारीच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी लोणी खुर्दमध्ये भेट दिली होती. घोगरे यांना ‘कामाला लागा’ असा संदेशही त्यांनी दिल्याचे सांगण्यात येते. मात्र, त्यांची पाठ फिरताच चार सदस्यांनी घोगरे यांची साथ सोडल्याचे पहायला मिळाले.
ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत सुमारे सहा महिन्यापूर्वी या गावात विखे यांच्या मंडळाला पराभवाला सामोरे जावे लागले होते. राष्ट्रवादीचे नेते एकनाथराव घोगरे पाटील यांच्या नेतृत्वाखालील परिवर्तन मंडळाने तेथे विजय मिळविला होती. ग्रामपंचायतीच्या १७ पैकी ११ जागा जिंकून त्यांनी विखे यांच्या गटाकडून सत्ता खेचून आणली होती. विखे समर्थकांना या अवघ्या ६ जागा मिळाल्या होत्या. त्यानंतर जनार्दन घोगरे पाटील संरपंच झाले आहेत. हा पराभव विखे यांच्या जिव्हारी लागला होता.
मात्र काळ राजकीय उलटापालट होऊन शनिवारी सत्ताधारी परिवर्तन मंडळाचे सदस्य शरद आहेर, संगीता तुपे, प्रदीप ब्राह्मणे व मायकल ब्राह्मणे यांनी विखे पाटील यांच्या उपस्थितीत जनसेवा मंडळात प्रवेश केला. आता सत्ताधारी परिवर्तन मंडळाकडे अवघे ६ सदस्य उरले आहेत. तर विरोधी सदस्यांची संख्या १० झाली आहे. एक जागा रिक्त आहे. आता पुढे काय घडामोडी होणार, सत्ता परिवर्तनाची प्रक्रिया कशी असेल, यासंबंधी चर्चा सुरू झाल्या आहेत.