जम्मू-काश्मीरचा काही भाग पर्यटनासाठी खुला

जम्मू-काश्मीरचा काही भाग पर्यटनासाठी खुला


दिल्ली,दि.२७ : देशात अनलॉक सुरू झाल्यापासून हळूहळू पर्यटन,हॉटेल तसेच अनेक ठिकाणी सवलती देण्याचा निर्णय सरकार घेत आहे. या पार्श्वभूमीवर जम्मू-काश्मीरच्या केंद्रशासित प्रदेशांमध्ये प्रशासनाने जागतिक पर्यटन दिनानिमित्त गुलमर्ग गोंडोला सेक्शन एकच्या गुलमर्ग ते कोंगडुरी परिसर पर्यटनासाठी खुला करण्याचा निर्णय घेतला आहे.

हा भाग केवळ शनिवारी आणि रविवारी खुला असेल,असे सांगण्यात आले आहे. पर्यटकांनी येत असताना सोशल डिस्टन्स आणि मास्क वापर करावा आणि कोव्हिडं – १९ च्या सर्व नियमांचे पालन करावे,असे आवाहन या विभागाच्यावतीने करण्यात आला आहे.

ग्लोबल न्युज नेटवर्क: