परमबीर सिंह लेटर बॉम्ब प्रकरणी केंद्राने मांडली पहिली भूमिका

मुंबईचे माजी पोलिस आयुक्त आणि विद्यमान महासंचालक, होमगार्ड परमबीर सिंग यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्र लिहून थेट गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर वाझे मार्फत १०० कोटी रुपयांच्या वसुलीचे अत्यंत गंभीर स्वरूपाचे आरोप लावले होते. आता या आरोपांवर केंद्रीय मंत्री रवी शंकर प्रसाद यांनी भूमिका मांडली आहे.

रवी शंकर प्रसाद म्हणाले की, गृहमंत्र्यांनी दर १०० कोटी रुपये गोळा करण्याचे सांगितले असेल तर इतर मंत्र्यांनीही अशीच टार्गेट दिली असतील. उद्धव ठाकरे यांच्या सरकारने एक दिवसाठीही राज्य चालवण्याचा नैतिक अधिकार गमावला आहे, असा टोला रवी शंकर प्रसाद यांनी लगावला आहे.

पुढे बोलताना रवीप्रसाद शंकर म्हणाले की, सचिन वाझेला कोणाच्या दबावातून पोलीस दलात पुन्हा घेण्यात आले, असा प्रश्न त्यांनी उपस्थित करत नाव न गेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला होता.

Team Global News Marathi: