गुजरात दंगलीला आता 20 वर्षे उलटून गेले तरी पण त्याच घटनेवर आधारित नुकतीच प्रदर्शित झालेली बीबीसीची एक डॉक्युमेंटरी वादात सापडली आहे. या माहितीवरून जवाहरलाल नेहरू विद्यापीठात , जामिया विद्यापीठात राडा झाला. या पार्श्वभूमीवर आता ‘बीबीसी’चा मोदींवरील माहितीपट दाखवण्यास मुंबईतील टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सने (टीस) ने नकार दिला आहे. संस्थेच्या परिसरात माहितीपट दाखवल्यास कारवाई करण्याचा ‘टीस’ने इशारा दिला आहे. विद्यार्थ्यांच्या मागणीला टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सने नकार दिला आहे.
‘टीस’ने जारी केलेल्या परिपत्रकात म्हटले आहे की, इन्स्टिट्यूटमधील काही विद्यार्थी मोंदीवरील माहितीपट संस्थेच्या प्रांगणात दाखवण्याची तयारी करत आहे. या माहितीपटावरून देशातील काही संस्थेत अशांतता निर्माण झाली आहे. तसेच या माहितीपटाला विरोध करण्यासाठी काही विद्यार्थ्यांनी संस्थामध्ये बैठका देखील घेतल्याची माहिती देखील मिळत आहे. त्यामुळे संस्थेतील विद्यार्थ्यांना सूचना करण्यात येत आहे की, अशा कोणत्याही कृतीत सहभागी झाल्यास विद्यार्थ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल.
दरम्यान TISS विद्यार्थी संघटनेचे नेता प्रतीक परमे म्हणाला की, संस्थेतील विद्यार्थ्यांनी अशा कोणत्याही माहितीपटाचे स्क्रिनिंग करण्याची योजना आखलेली नाही. माहितीपटाबद्दल आम्हाला संचालकांकडून नियमावली मिळाली आहे. परंतु आम्ही असा कोणताही माहितीपट प्रदर्शित करण्याचा विचार करत नाही. परमे म्हणाले की, प्रोग्रेसिव्ह स्टुडंट्स फोरम (PSF) ने हे स्क्रिनिंग आयोजित केल्याची माहिती आहे. परंतु आम्ही त्याचा भाग नाही असे त्यांनी म्हंटले आहे.