मुंबई | गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुंबई दौऱ्यावर होते. त्यांच्या हस्ते मुंबईमधील अनेक विकास कामांचं उद्घाटन करण्यात आलं. मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा दौरा महत्त्वपूर्ण मानला जात आहे. मात्र त्याचबरोबत गेल्या अनेक दिवसांपासून भाजप आणि शिंदे गट यांच्यामध्ये अंतर्गत वाद होत असल्याच्या असल्याच्या बातम्या समोर येत आहे.
या पार्श्वभूमीवर देखील हा दौरा महत्त्वपूर्ण ठरला असल्याचं समोर आलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई दौऱ्यानंतर भाजप आणि शिंदे गटातील अंतर्गत कुरघोडींना पुर्णविराम मिळण्याची शक्यता आहे. सत्तांतर झाल्यानंतर आज पहिल्यांदाच भाजप आणि शिंदे गटातील नेत्यांची संयुक्त बैठक होणार असल्याची माहिती सुत्रांकडून मिळत आहे.आज संयुक्त बैठक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भापच्या पाठिंब्यावर मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. सध्या भाजप आणि शिंदे गट सत्तेत आहेत. मात्र या दोन्ही पक्षांमध्ये अंतर्गत कुरघोडी सुरू असल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. अखेर हा वाद मिटवण्यासाठी आता मोदींनीच पुढाकार घेतला आहे.
गुरुवारी मोदींचा दौरा झाला आणि आज भाजप व शिंदे गटातील नेत्यांमध्ये संयुक्त बैठक होणार असल्याची माहिती समोर आली आहे. आज दुपारी बारानंतर ही बैठक होणार आहे. सत्तांतरानंतर पहिलीच बैठक सत्तांतर झाल्यानंतर प्रथमच भाजप आणि शिंदे गटातील नेत्यांची आज संयुक्त बैठक होणार आहे. आज दुपारी बारानंतर ही बैठक होणार असल्याची माहिती समोर येत आहे. या बैठकीला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासोबत शिंदे गट आणि भाजपाचे सर्व आमदार, खासदार उपस्थित राहणार आहेत.