सोलापूर : पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणूकीसाठी अर्ज दाखल करण्यास एक दिवसांचा अवधी असताना राष्ट्रवादी कॉग्रेसने आपला उमेदवार जाहिर केला आहे. राष्ट्रवादी दिवंगत नेते भारत भालके यांच्या निधनामुळे येथे पोटनिवडणूक लढवली जात आहे. त्यासाठी राष्ट्रवादीने भारत भालके यांचे चिरंजीव भगीरथ भारत भालके यांना उमेदवारी जाहिर केली आहे. याबबत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी ट्विट करुन ही माहिती दिली.
राष्ट्रवादीकडून भगीरथ भालके, भाजपकडून समाधान अवताडे तर शिवसेनेच्या नेत्या शैला गोडसे अपक्ष म्हणून निवडणूकीच्या रिंगणात उतरल्या आहेत. यामुळे या पोटनिवडणूकीकडे राज्याचे लक्ष लागले आहे.
भाजपचा उमेदवार
पंढरपूर पोटनिवडणुकीसाठी ३० मार्च अर्ज भरण्याचा उद्या शेवटचा दिवस आहे. या दोन्ही प्रमुख उमेदवारांनी अद्याप अर्ज दाखल केले नाहीत. त्यामुळे आज या दोन्ही पक्षांच्या उमेदवारांचे या अर्ज भरण्यासाठी कोणते दिग्गज नेते उपस्थित राहून शक्तिप्रदर्शन करणार आहेत याकडे सर्वांचे लक्ष आहे
आदरणीय शरद पवार साहेब यांच्या मान्यतेने पंढरपूर – मंगळवेढा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत श्री. भगीरथ भारत भालके यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार घोषित करण्यात येत आहेत. ते नक्की विजय होतील, असा आम्हाला विश्वास आहे. भगीरथ भालके यांना शुभेच्छा ! @NCPspeaks
— Jayant Patil (@Jayant_R_Patil) March 29, 2021