मुंबई | मागच्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्यक मंत्री नवाब मलिक हे एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर पत्रकार परिषेद आणि ट्विटच्या माध्यमातून गंभीर आरोप लगावत आहे. त्यातच गेल्या काही दिवसांपासून राज्यात नवाब मलिक विरूद्ध समीर वानखेडे असा वाद चांगलाच पेटला असल्याचं पाहायला मिळालं होतं. शिवाय त्यांनी वेळोवेळी समीर वानखेडे मुस्लिम असल्याचा दावा करत अनेक कागदपत्रे ट्विटरवर शेअर केल्याचं पाहायला मिळालं.
दरम्यान, नवाब मलिकांनी शेअर केलेल्या कागदपत्रांनंतर आता मध्यरात्री त्यांनी ट्विटरवर शेअर केलेल्या फोटोने एकच खळबळ उडाली आहे. नवाब मलिकांनी काल मध्यरात्री ट्विटरवर समीर वानखेडे यांचा फोटो टाकला आहे. त्या फोटोमध्ये समीर वानखेडे हे मुस्लिम वेशात स्पष्टपणे दिसून येत आहेत. आता या फोटोमुळे पुन्हा एकदा नव्या चर्चेला उधाण आले आहे.
समीर वानखेडेंचा मुस्लिम वेशातील फोटो शेअर करत नवाब मलिकांनी कबूल, कबूल, कबूल असं ट्विटरवर लिहिलं आहे. समीर वानखेडे व त्यांचे कुटूंबीय वारंवार आपण मुस्लिम नसल्याचा दावा करत आहेत. तसेच त्यांनी अनेकवेळा याबाबत खुलासाही केला आहे. पण नवाब मलिकांनी शेअर केलेल्या फोटोमुळे आता अनेक चर्चांना उधाण आलं आहे. यावर आता वानखेडे कुटुंबीय काय प्रतिक्रिया देतायत हे पाहावे लागणार आहे.
कबूल है, कबूल है, कबूल है…
यह क्या किया तुने Sameer Dawood Wankhede ? pic.twitter.com/VaVMZbrNo0— Nawab Malik نواب ملک नवाब मलिक (@nawabmalikncp) November 21, 2021