उस्मानाबाद-कळंबचे आमदार कैलास पाटील कोरोना बाधित

अमर चौंदे

उस्मामानाबाद :  उस्मानाबाद-कळंब विधानसभा मतदारसंघाचे आ. कैलास पाटील यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. मुंबई येथे विधिमंडळाच्या अधिवेशनादरम्यान त्यांनी कोरोना चाचणी केल्यानंतर अहवाल पॉझिटिव्ह आला असून त्यांची तब्यत स्थिर असल्याचे त्यांनी स्वतः सोशल मीडियावरून सांगितले आहे.

मागील ४ दिवसपूर्वीच आ. कैलास पाटील हे मुंबईला विधिमंडळाच्या अधिवेशनाकरिता गेले होते. अधिवेशनाच्या अगोदरही त्यांनी कोरोना चाचणी केली होती. त्यावेळी अहवाल निगेटिव्ह आला होता. त्यामुळे पाटील हे अधिवेशनात सहभागी झाले होते.  काल पुन्हा त्यांची कोरोना चाचणी केली होती,  त्याचा अहवाल शुक्रवारी प्राप्त झाला असुन त्यामध्ये ते पॉझिटिव्ह आले आहेत. 

हि माहिती त्यांनी स्वतः सोशल मीडियाद्वारे दिली असून  मागील आठ ते दहा दिवसापुर्वी त्यांच्या  संपर्कात आलेल्या प्रत्येकांनी काळजी घ्यावी व लक्षणे आढळुन येत असल्यास तातडीने टेस्ट करुन घ्यावी असे आवाहन पाटील यांनी केले आहे.

 तसेच त्यांची प्रकृती ठिक असुन काळजीचे कोणतेही कारण नसल्याचे त्यांनी सांगितले आहे. लवकरच उपचार घेऊन मी पुन्हा तुमच्या सेवेसाठी तयार असेन असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे

ग्लोबल न्युज नेटवर्क: