उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटके भरलेली स्कॉर्पिओ ठेवल्याप्रकरणात तब्बल १३ तासांच्यावर सचिन वाझे यांची NIA कडून चौकशी करून अटक करण्यात आली होती. तसेच या प्रकरणी अनेक खुलासे होत आहे.
आता हाच मुद्धा पकडून विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी पुन्हा एकदा सचिन वाझे प्रकरणावरून महाविकास आघाडी सरकरचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. सचिन वाझे यांना अटक झाल्यानंतर अमृता फडणवीस यांनी पहिल्यांदाच संपूर्ण प्रकरणावर भाष्य केले होते.
ते आपल्या ट्विटमध्ये म्हणतात की, “एकीकडे नागपूरसारख्या शहरांमध्ये करोना बाधित रुग्णांना भरती करण्यासाठी बेड उपलब्ध नाहीत. तर दुसरीकडे महाराष्ट्र सरकार कोविड सेंटरमधून भ्रष्टाचार करत आहे आणि उद्योगपतींना भीती दाखवून त्यांच्याकडून वसुली करण्याची योजना आपल्याच काही हस्तकांसोबत बनवत आहे,” असं अमृता फडणवीस यांनी म्हटलं आहे.
https://twitter.com/fadnavis_amruta/status/1372081602394648576