मोदी सरकारच्या काळात दलितांवर अत्याचार वाढले,  केंद्रीय मंत्र्याने दिली माहिती

 

 

नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या काळात दलितांवरील अत्याचारांमध्ये अतोनात वाढ झाली आहे. २०१८ ते २०२० या तीन वर्षांच्या कालखंडात देशात दलितांवरील अत्याचारांसंदर्भात १ लाख ३८ हजार ८२५ गुह्यांची नोंद झाली, अशी माहिती रिपाई पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि  केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी संसदेत दिली.

बहुजन समाज पक्षाचे खासदार हाजी फजलुर रहमान यांनी दलितांवरील अत्याचाराच्या वाढत्या संख्येबाबत प्रश्न विचारला होता. त्याला उत्तर देताना रामदास आठवले यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ही माहिती दिली. त्यांनी यावेळी आकडेवारी सादर केली. २०१८ मध्ये दलितांवरील अत्याचारांची ४२,७९३, २०१९ मध्ये ४५ हजार ९६१ आणि २०२० मध्ये ५० हजार २९१ होती.

 

तर उत्तर प्रदेशात दलितांवर सर्वाधिक अत्याचार झाले. तिथे २०२० मध्ये १२७१४ प्रकरणे घडली. तीन वर्षांत सर्वाधिक ३६,४६७ प्रकरणे देखील उत्तर प्रदेशातच नोंदवली गेली. बिहारमध्ये २०,९७३ राजस्थानमध्ये १८,४१८ आणि मध्य प्रदेशात १६,९५२  प्रकरणांची नोंद झाली. भाजपचे राज्य नसलेल्या राज्यांमध्ये दलित अत्याचाराच्या घटना सर्वात कमी आहेत.

Team Global News Marathi: