नाद करायचा नाय…!  खिशात १० रुपये आहेत का म्हणून अपमान, शेतकऱ्याने अर्ध्या तासात १० लाख जमवून घेतली गाडी; वाचा काय घडले नेमके

नाद करायचा नाय…!  खिशात १० रुपये आहेत का म्हणून अपमान, शेतकऱ्याने अर्ध्या तासात १० लाख जमवून घेतली गाडी; वाचा काय घडले नेमके

शेतकरी हा कोणत्याच बाबतीत कमी नसतो हे एका शेतकऱ्याने दाखवून दिले आहे. एका शेतकऱ्याने शोरूम वाल्याला असा काही इंगा दाखवला कि ते शोरूम आणि तेथील कर्मचारी नीटच केले. माणसाला त्याच्या कपड्यांवरून कमी जास्त ठरवता कामा नये. अशीच चूक या कार शोरूमच्या सेल्समनने केली होती. एक शेतकरी त्याच्या मित्रांसह कर्नाटकातील तुमकूर येथील कार शोरूममध्ये पोहोचला.

शेतकरी त्याची ड्रीम कार खरेदीसाठी गेला होता पण त्याचे कपडे पाहून सेल्समनने त्याला हुसकावून लावले. तो सेल्समन शेतकऱ्याला म्हणाला तुझ्या खिशात १० रुपये तरी आहेत का? चालला कार खरेदी करायला. अपमानित होऊन गेलेला शेतकरी 30 मिनिटांच्या आत 10 लाख रुपये कॅश घेऊन त्याची ड्रीम कार खरेदी करण्यासाठी परतला.

हे प्रकरण चिक्कसांद्र हुबळी येथील रमणपल्या येथील शेतकरी केम्पेगौडा आरएल यांच्यासोबत घडले. व्यवसायाने सुपारी शेतकरी असलेले केम्पेगौडा एसयूव्ही बुक करण्यासाठी शोरूममध्ये पोहोचले होते. यादरम्यान त्यांचा पेहराव पाहून सेल्समनने त्यांची खिल्ली उडवली. शेतकऱ्याने महिंद्रा बोलेरोची चौकशी केली होती. डील फायनल करण्यासाठी तो दोन दिवसांपूर्वी मित्रांसोबत शोरूममध्ये आला होता. सुरुवातीला त्याने 2 लाख रुपये डाऊन पेमेंट करून त्याच दिवशी डिलिव्हरी देण्याची शोरूमला विनंती केली. सेल्स टीमने नकार दिल्यावर त्याने 10 लाख रुपये कॅश दिल्यावर गाडीची डिलिव्हरी एका दिवसात मागितली. यावरूनच शोरूमच्या कर्मचाऱ्यांनी शेतकऱ्याची चेष्ठा करून खिल्ली उडवली.

सेल्समन म्हणाला, ’10 लाख रुपये दूर, तुमच्या खिशात 10 रुपयेही नसतील.’ शेतकरी आपला वेळ वाया घालवण्यासाठी विनाकारण आले आहेत असे त्याला वाटले. मात्र त्याच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी २५ मिनिटांत दहा लाख रुपये रोख आणल्यास आजच गाडीची डिलिव्हरी देऊ, असे सेल्समनने सांगितले. सेल्समनला वाटले कि हा शेतकरी १० लाख कुठून आणणार.

केम्पेगौडा त्यांच्या शेतात चमेली आणि क्रॉस्ड्रा देखील पिकवतात. त्यांनी ताबडतोब मित्रांना बोलावून रोख रकमेची व्यवस्था केली. दहा लाख रुपये जमवून तो एसयूव्हीची डिलिव्हरी घेण्यासाठी मित्रांसह शोरूममध्ये पोहोचला. अर्ध्या तासातच त्यांनी कॅशची व्यवस्था केली. पण कॅश घेऊन पोहचल्यानंतर त्यांना सेल्स टीमने सांगितले की त्यांना वाहनाच्या डिलिव्हरीसाठी किमान 3 दिवस लागतात.

आधी अपमान केल्यामुळे आणि नंतर पैसे आणल्यावरही डिलिव्हरी देत नसल्याने शोरूममध्ये शेतकऱ्यांनी गोंधळ घातला. शुक्रवारी घडलेल्या घटनेनंतर कारची डिलिव्हरी होऊ शकली नाही. शनिवार व रविवार शासकीय सुटी असल्याने कर्मचाऱ्यांनी असहाय्यता व्यक्त केली. यामुळे केम्पेगौडा आणि त्यांचे मित्र नाराज झाले. तक्रार देण्यासाठी त्यांनी पोलिसांना बोलावले.

या घटनेचा व्हिडिओ शनिवारी व्हायरल झाला. शेतकऱ्यांनी शोरूमला घेराव घातला आणि ते बाहेर पडायला तयार नव्हते. कसेबसे टिळक पार्क पोलिस ठाण्याच्या पोलिसांनी समज देऊन घरी जाण्यास सांगितले. केम्पेगौडा म्हणाले, ‘माझा आणि माझ्या मित्रांचा अपमान केल्याबद्दल मी सेल्स एक्झिक्युटिव्ह आणि शोरूमच्या अधिकाऱ्यांना लेखी माफी मागायला सांगितले आहे… आता, मला कार नको आहे. शोरूमसमोर उपोषण करण्याचा इशारा त्यांनी दिला.

या घटनेचा व्हिडीओ संपूर्ण सोशल मीडियावर भन्नाट व्हायरल झाला आहे. आणि कर्नाटक मधील हा शेतकरी संपूर्ण देशात एक चर्चेचा विषय ठरला आहे. या प्रकरणावरून बळीराजा हा खरच राजा आहे आणि आगामी काही दिवसात बळीचेच राज्य येईल हे सिद्ध होत आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओतील शेतकऱ्याचे संपूर्ण देशभरातून कौतुक केले जात आहे. अनेकांनी ट्विटरवर हा व्हिडिओ शेअर करत महिंद्रा समूहाचे आनंद महिंद्रा यांना टॅग देखील केले आहे.

ज्याप्रमाणे मुखपृष्ठ पाहून पुस्तकाबद्दल मत बनवू नये, त्याचप्रमाणे कोणत्याही व्यक्तीचे कपडे पाहून त्याविषयी मत बनवू नका. पण कार शोरूमच्या सेल्समनला या गोष्टी कुठे माहीत असणार. त्याला माहीत असते तर असे अजिबात केले नसते.

ग्लोबल न्युज नेटवर्क: