Saturday, February 4, 2023
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
No Result
View All Result

निधनानंतर पूर्ण झालेली ‘ती’ स्मिता पाटील यांची शेवटची इच्छा

by Team Global News Marathi
October 17, 2022
in राजकारण
0
निधनानंतर पूर्ण झालेली ‘ती’ स्मिता पाटील यांची शेवटची इच्छा

 

हिंदी कलाजगतातील अद्वितीय अभिनय कौशल्य असणाऱ्यांच्या यादीत स्मिता पाटील यांचं नाव निर्विवादपणे घेतलं जातं. फार कमी वयातच जग सोडून गेलेल्या या अभिनेत्रीचे चित्रपट आजही नवोदितांसाठी प्रेरणास्त्रोत ठरत आहेत. हिंदी आणि मराठी कलाजगतावर आपली वेगळी छाप सोडणाऱ्या या अभिनेत्रीच्या जन्मदिवसानिमित्त पुन्हा एकदा त्यांच्या आठवणींना उजाळा दिला जात आहे.

स्मिता पाटील, नाव घेताच डोळ्यांसमोर एक असा चेहरा उभा राहतो जो तुम्हाला तुमच्याआमच्यातलाच वाटतो. जीवनाचा प्रवास लहान असला तरीही स्मिता यांनी त्यातही असंख्य आठवणी प्रेक्षकांना आणि त्यांच्या जवळच्या व्यक्तींना दिला. पण, नियतीनं मात्र स्मिता पाटील यांच्यासोबत जी वेळ आणली ते पाहून कित्येकांच्याच डोळ्यात पाणी आलं.

स्मिता पाटील अभिनेता राज कुमार यांच्यासोबत ‘गलियों का बादशाह’ चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यग्र होत्या. एके दिवशी जेव्हा त्या या अभिनेत्याला भेटण्यासाठी त्यांच्या मेकअप रुममध्ये गेल्या तेव्हा त्यांनी पाहिलं, की तिथं त्यांचा मेकअप सुरु होता. दीपक सावंत हे मेकअप आर्टिस्ट तिथं स्मिता पाटील यांच्याही मेकअपची जबाबदारी सांभाळत होते.

बस्स, तेव्हाच त्यांनी आपणही त्यांच्याकडून असाच निवांत झोपून मेकअप करुन घेऊ अशी इच्छा व्यक्त केली. राज कुमार यांना पाहून तुम्ही असं काही ठरवू नका, असा सल्ला खुद्द सावंत यांनीच पाटील यांना दिला. तुम्ही बसूनच मेकअप करुन घ्या कारण, तेव्हाच तो व्यवस्थित करता येतो असं सांगताना राजकुमार यांची बात काही औरच असल्याचंही ते म्हणाले.

दीपक यांचं स्मिता पाटील यांनी ऐकलं. पण, पुढे होत्याचं नव्हतं झालं. 1986 मध्ये या अभिनेत्रीनं जगाचा निरोप घेतला. चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान त्यांनी जी इच्छा व्यक्त केली होती ती अखेर त्यांच्या निधनानंतर पूर्ण झाली. अभिनेत्रीच्या निधनानंतर अंत्यसंस्कारांच्या आधी खुद्द सावंत यांनीच स्मिता पाटील यांना मेकअप करत थरथरत्या हातानं त्यांना एखाद्या नववधुप्रमाणं सजवलं होतं.

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window)
  • Click to share on Twitter (Opens in new window)
  • Click to share on WhatsApp (Opens in new window)
ADVERTISEMENT
Next Post
अपघात झाल्यास मृताची ‘दुसरी पत्नी आणि मुले’ देखील नुकसान भरपाईसाठी पात्र, कर्नाटक उच्च न्यायालयाचा निर्णय

अपघात झाल्यास मृताची 'दुसरी पत्नी आणि मुले' देखील नुकसान भरपाईसाठी पात्र, कर्नाटक उच्च न्यायालयाचा निर्णय

Recent Posts

  • मालवणात बॅनर लावण्यावरून भाजप-ठाकरे शिवसेनेत वाद, नेमकं काय आहे प्रकरण
  • ईडी कारवाईनंतर केडीसी जिल्हा बँकेतील कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन
  • शुभांगी पाटील लवकरच उद्धव ठाकरे यांची घेणार भेट
  • व्हॉट्सअॅप स्टोरेज फुल झालं ? एका मिनिटात स्पेस कशी रिकामी करायचा
  • कसबा पोटनिवडणुकीतून टिळक कुटुंबियांना डावलून या नावाची जोरदार चर्चा

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र

Website maintained by Tushar Bhambare.

WhatsApp Group