‘कुणी सावरकरांवर प्रश्न उपस्थितीत केले म्हणून पंडीत नेहरूंवर विधान केले पाहिजे, निदान हे स्वत: सावरकरांचे वंशज म्हणून घेणाऱ्यांनी हे थांबवलं पाहिजे. ही आपली परंपरा नाही’ असं म्हणत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी विनायक दामोदर सावरकर यांचे पणतू रणजीत सावरकर यांना वाद न वाढवण्याची विनंती केली. काल पत्रकार परिषेद घेऊन रणजीत सवेरारांनी पंडित नेहरू यांच्यावर टीका करून नव्या वादाला सुरवात केली होती
राहुल गांधी यांनी सावरकर यांच्याबद्दल वक्तव्य केल्यानंतर राज्यात वादंग निर्माण झाला आहे. भाजपने आता नेहरू यांच्यावर टीका केली आहे. मुंबईत पत्रकारांशी बोलत असताना संजय राऊत यांनी रणजीत सावरकर यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. ‘स्वातंत्र्यवीर सावरकर हे कुठल्या एका पक्षाचे नाही. देश उभारण्यासाठी त्यांनी त्याग केलं आहे. जी लोक जिवंत नाही, त्यांच्याविरोधात वाटेल ती विधानं केली नाही पाहिजे’ असा टोला राऊत यांनी भाजपच्या नेत्यांना लगावला.
‘पंडीत नेहरू यांनी देशासाठी काय केलं हे सर्वांना माहिती आहे. महात्मा गांधी, सरदार वल्लभभाई पटेल, अश्फाक उला खान, मौलाना आझाद, लाल बहादूर शास्त्री, वीर सावरकर यांचं देशासाठी योगदान आहे. कुणी सावरकरांवर प्रश्न उपस्थितीत केले म्हणून पंडीत नेहरूंवर विधान केले पाहिजे, निदान हे स्वत: सावरकरांचे वंशज म्हणून घेणाऱ्यांनी हे थांबवलं पाहिजे. ही आपली परंपरा नाही. आम्ही सगळे सावरकरांचे भक्त आहोत. इथं त्यांच्यासाठी लढा देत आहे’ असं म्हणत राऊत यांनी रणजीत सावरकर यांची समजूत काढली.