बॉलिवुड अभिनेता सुशांत सिंग राजपुत आजही चाहत्यांच्या बाबी को-स्टार यांच्या आठवणीत आहे. काल त्याचा वाढदिवस असल्याने सर्वांच्याच आठवणी ताज्या झाल्या. अभिनेत्री सारा अली खान हिने ‘ केदारनाथ’ सिनेमातून सिनेसृष्टीत पाऊल ठेवले होते.यामध्ये सुशांतसिंग तिचा सहकलाकार होता. सुशांतचा वाढदिवस साराने एनजीओतील मुलांसोबत साजरा केला. त्याचा व्हिडिओ तिने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.
‘बाल आशा ट्र्स्ट’ या एनजीओमध्ये काल सारा अली खान आली होती. तेथील मुलांसोबत तिने केक कट करत सुशांतसिंगचा वाढदिवस साजरा केला. यामुळे मुलांच्या चेहऱ्यावरही आनंद दिसला. साराने कॅप्शनमध्ये लिहिले, ‘सुशांत, वाढदिवसाच्या शुभेच्छा. इतरांना खूष करणं तुझ्यासाठी किती महत्वाचं होतं हे मला माहित आहे. तू आम्हाला वरुन बघत आहेस, वरती चंद्राजवळ तू पोहोचला आहे, मला आशा आहे आज आम्ही तुझ्या चेहऱ्यावर हसू आणलं असेल. असाच चमकत राहा. जय भोलेनाथ.’
साराने एनजीओचे ही आभार मानले आहेत. तिने लिहिले, ‘आज हा दिवस खास बनवण्यासाठी तुमचेही आभार. तुमच्यासारखे लोकच जगाला सुंदर बनवतात, सुरक्षित आणि आनंदी बनवतात. असाच आनंद पसरवत राहा. अशी पोस्ट तिने केली आहे तसेच नेक कलाकारांनी आणि चाहत्यांनी आठवण करून सुशांतच्या आठवणी जगावल्या आहेत.