सध्या शिवसेना विरुद्ध नारायण राणे एकण्यातील वाद वादात असताना दुसरीकडे आता राष्ट्रवादीचे प्रादेशाध्यक्ष जयंत पाटील आज भाजपाला जोरदार धक्का देण्याच्या तयारीत आहेत, भाजपचे माजी आमदार विलासराव शिंदे यांचे सुपुत्र वैभव शिंदे राष्ट्रवादी पक्षात प्रवेश करणार आहेत. आज, शुक्रवार जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या उपस्थितीत वैभव शिंदे राष्ट्र्वादीत प्रवेश करणार आहेत.
मात्र वैभव शिंदे जरी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करत असतील तरी देखील शिंदे गटाचे स्वतंत्र अस्तित्व कायम ठेवावे, अस मत कार्यकर्त्यांनी व्यक्त केले आहे. या राष्ट्रवादी प्रवेशासंदर्भात विलासराव शिंदे विद्यालयात वाळवा तालुक्यामधील नगसेवक आणि विविध संस्थांचे पदाधिकारी महिलांचा मेळावा झाला. यावेळी सर्वांनी वैभव शिंदे यांना राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करण्यास संमती दिली. तसेच यावेळी अनेकांनी आपली मत व्यक्त केली.
प्रवेशाबाबत वैभव शिंदे म्हणाले की, ‘कार्यकर्त्यांना विचारात घेऊन भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्याचप्रमाणे आताही राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करताना कार्यकर्त्यांना विश्वासात घेतले आहे. विकासात्मक वाटचालीकरिता एकत्र येत आहोत.’ दरम्यान भाजपचे माजी आमदार विलासराव जगताप यांनी येणारी निवडणूक सोबत लढू. पण महाविकासआघाडीमधील काँग्रेसला विरोध असेल, अशी स्पष्ट भूमिका जयंत पाटील यांच्या समोर मागील आठवड्यात स्पष्ट मांडली होती. त्यामुळे जत तालुक्याच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ माजली आहे.