चंद्रपूर | शहरात गेल्या काही महिन्यात दुचाकीचोरीचे प्रमाणे वाढले आहे. दुचाकीचोरीच्या या टोळीला पकडण्यासाठी जेव्हा स्थानिक पोलिसांनी जाळं टाकले तेव्हा या टोळीत राष्ट्रवादीची पदाधिकारी असलेल्या युवतीचाही समावेश असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या घटनेची आता संपूर्ण महाराष्ट्रभर चर्चा सुरु झालेली आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, शहरात वाहन चोरीच्या घटना वाढत असल्याचे समोर येताच पोलिसांनी चोरांचा तपास करण्यास सुरुवात केली या तपासात अशी माहिती हाती आली की,’एक व्यक्ती दुचाकी विकण्यासाठी ग्राहकाचा शोध घेत आहे. गाडीच्या निम्या किंमतीला ही गाडी विकण्यात येणार आहे.यानंतर पोलिसांनी संबंधित व्यक्तीचा शोध घेत सापळा रचला यात वाहनचोरी करणाऱ्या टोळीला ताब्यात घेतलं आणि चक्क या टोळीमध्ये राष्ट्रवादीची पदाधिकारी असलेल्या युवतीचाही समावेश असल्याचं आढळून आलं आहे.
मिळलेल्या पोलीस माहितीनुसार या टोळीने आतापर्यंत १९ दुचाकी चोरल्या असलयाचे तपासात समोर आलं आहे. लॉक नसलेल्या मोपेड चोरून त्या विकण्याचा गोरखधंदा ही टोळी करत होती. सदर तरुणीबाबत (चंद्रपूर ) राष्ट्रवादी युवती काँग्रेसचं शहराध्यक्ष हे पद होते. वृत्तमाध्यमांनी या प्रकरणानंतर चंद्रपूर राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजीव कक्कड यांनी विचारले असता, या तरूणीचं महिन्यापूर्वीच निलंबन केलं असल्याचं सांगितलं आहे.