मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि अल्पसंख्यक मंत्री नवाब मलिक मागच्या काही दिवसांपासून पत्रकार परिषद घेत एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप करत आहेत. त्यासोबतच भारतीय जनता पक्षावरही निशाणा साधत आहेत.
शुभ दीपावली
आप सभी की दिवाली मंगलमय होहोटल 'The Lalit' मे छुपे है कई राज़…
मिलते है रविवार को— Nawab Malik نواب ملک नवाब मलिक (@nawabmalikncp) November 3, 2021
याच दरम्यान आता नवाब मलिक यांनी दोन सूचक ट्वीट केले आहेत. तसेच रविवारी भेटूयात असं म्हटलं आहे. त्यामुळे आता नवाब मलिक कोणता नवा गौप्यस्फोट करणार आणि आता मलिकांचा निशाणा कोणावर असणार यावरुन विविध चर्चा रंगू लागल्या आहेत. नवाब मलिक यांनी ट्विट करत म्हटलं, “शुभ दीपावली, आप सभी की दिवाळी मंगलमय हो…. तसेच होटल ‘The Lalit’ मे छुपे है कई राज… मिलते है रविवार को” नवाब मलिक यांनी केलेल्या या सूचक ट्विटमुळे आता चर्चांना उधाण आले आहे.
बात निकलेगी तो फिर दूर तलक जायेगी
लोग बेवजह उदासी का सबब पूछेंगे— Nawab Malik نواب ملک नवाब मलिक (@nawabmalikncp) November 3, 2021
तसेच नवाब मलिक आता कोणता नवा गौप्यस्फोट करतात हे पहावं लागेल. लोग बवजह उदासी का सबब पुछेंगे”. नवाब मलिक हे सातत्याने ट्विट करुन किंवा पत्रकार परिषद घेऊन गेल्या काही दिवसांपासून गौप्यस्फोट आणि आरोप करत आहेत. त्यामुळे आता नवाब मलिक यांच्या निशाण्यावर कोण आहे आणि काय नवा गौप्यस्फोट करतात हे येत्या रविवारीच स्पष्ट होईल.