राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी थेटएनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि भारतीय जनता पक्षावर गंभीर आरोप लगावत एकच खळबळ उडवून दिली होती. आता त्यांच्या या आरोपांना भाजपने सुद्धा सडेतोड उत्तर दिले आहे. मलिक यांच्याकडे ३ हजार कोटींची संपत्ती आहे. त्यांच्या एकूण २२ संपत्ती आहे, असा गौप्यस्फोट करतानाच भंगारवाला करोडपती कसा झाला? असा सवाल भाजप नेते मोहित कंबोज यांनी केला आहे.
मोहित भारतीय शुक्रवारी पत्रकार परिषद घेऊन नवाब मलिक यांची पोलखोल करणार आहेत. त्यापूर्वीच त्यांनी खुलासा करून एकच खळबळ उडाली आहे. नवाब मलिक यांच्याकडे ३ हजार कोटींची बेनामी संपत्ती आहे. त्यांच्याकडे एकूण २२ संपत्ती आहेत. त्यांचं संपूर्ण कुटुंब फॅमिली ट्रस्टच्या नावाने जोडले गेले आहेत. भंगारवाला करोडपती कसा झाला हे राज्यातील जनतेला कळायला हवं, असं भारतीय म्हणाले.
आज नवाब मलिक यांची मी सगळी पोलखोल करणार आहे. त्यानंतर त्यांना तोंड दाखवायला जागा उरणार नाही. उत्तरे देण्याचीही त्यांची लायकी उरलेली नसेल, असं सांगतानाच राज्यात सलीम-जावेदने चित्रपट सुरू केला होता. त्याचा द एन्ड मीच करणार. आज सलीम-जावेदच्या चित्रपटाची खरी स्क्रिप्ट आणि खरा चेहरा जगासमोर येणार आहे, असा सूचक इशाराही त्यांनी दिला.