खासदार नवनीत राणा ह्या राजकीय क्षेत्राबरोबर समाजक्षेत्रात सुद्धा चांगल्याच सक्रिय असतात तसेच त्या विविध गोष्टींमुळे चर्चेत देखील असतात. सध्या त्यांचा एक व्हिडीओ चर्चेत आला आहे. या व्हिडिओत आपल्याला नवनीत राणांचा फिल्मी अंदाज पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेला अल्लू अर्जुनच्या पुष्पा चित्रपटाने सर्वांची मने जिंकली आहेत.
पुष्पा या चित्रपटाती त्याच्या डॉयलॉगबाजीचा फिव्हर सामान्य नागरिकांपासून ते सेलिब्रेटीजपर्यंत सर्वांना चढला होता. त्यातच आता नवनीत राणांचाही पुष्पा चित्रपटातील एक डायलॉग म्हणतानाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ त्यांनी त्यांच्या फेसबुक अकाउंट वर आणि ट्विटरवर शेअर केला आहेत. “नवनीत नाम सूनके क्या लगा फ्लॉवर है, फ्लॉवर नही.. फायर है” असा डायलॉग त्यांनी या व्हिडिओत म्हटला आहे.
— Navneet Ravi Rana (@navneetravirana) March 20, 2022
या व्हिडिओला नेटकऱ्यांकडून लाईक आणि कंमेंट करण्यात येत आहेत. दोनदिवसांपूर्वी, देशभरात होळी व धुलिवंदन उत्साहात साजरा होत असतानाच खासदार नवनीत राणा यांनीदेखील आपल्या मतदारसंघातील आदिवासी बांधवांसोबत होळी सण साजरा केली. त्याचदरम्यान, पुर्णपणे रंगाने माखलेल्या मुलांसोबत त्यांनी ‘पुष्पा’चा फेमस डॉयलॉग बोलून दाखवला. त्यावेळी त्यांचा व्हिडीओ चर्चेत आला होता. होळीनिमित्त राज्यात एकीकडे आरोप-प्रत्यारोपांची धुळवड रंगलेली असतानाच नवनीत राणांचा हा अंदाज सोशल मीडियावर चांगलाच पसंत केला जात आहे.