पंजाब | पंजाब काँग्रेसमध्ये अनेक राजकीय घडामोडी नंतर काँग्रेसच्या अध्यक्षपदी नवज्योत सिंग सिध्दू यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आता याच मुद्द्यावरून भाजपकडून पंजाब काँग्रेसवर पहिलीच बोचरी प्रतिक्रिया आली आहे.
नवज्योत सिंग सिध्दू हे पंजाबच्या कॉमेजी सर्कस सरकारचे प्रमुख बनले आहेत, अशी टीकात्मक प्रतिक्रिया भाजपचे सरचिटणीस तरूण चुग यांनी व्यक्त केली. काँग्रेस नेतृत्वाला कळून चुकले आहे की अमरिंदर सिंग सरकार फेल झाले आहे. त्यामुळे आता पंजाबच्या कॉमेडी सर्कस सरकारचे प्रमुख होण्यासाठी नवज्योत सिंग सिध्दू यांची नियुक्ती करण्यात आली आहे अशी टीका चुग यांनी केली आहे.
तरूण चुग म्हणाले, की काँग्रेसने आतापर्यंत पंजाबमध्ये किमान अर्धा डझन प्रदेशाध्यक्ष बनवले आहेत. काँग्रेस नेतृत्वाला कॅप्टन अमरिंदर सिंग यांना वेसण घालायची आहे. पण त्या पैकी कोणत्याही प्रदेशाध्यक्षाला ती असाइनमेंट पूर्ण करता आलेली नाही. आता नवज्योत सिंग सिध्दू यांना अमरिंदर सिंग यांच्या पायात पाय घालण्यासाठी पाठविले आहे.