मुंडे,तावडे,मुनगंटीवार यांच्यासह चित्रा वाघ यांच्यावर भाजपने सोपवली महत्वाची जबाबदारी

राष्ट्रीय कार्यकारिणी: मुंडे,तावडे,मुनगंटीवार यांच्यासह चित्रा वाघ यांच्यावर भाजपने सोपवली महत्वाची जबाबदारी

मुंबई । माजी मंत्री व मराठवाड्याच्या भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्याकडे मध्य प्रदेशचे प्रभारीपद देण्यात आले आहे. काही महिन्यांपूर्वीच मुंडे यांच्यावर पक्षाने राष्ट्रीय सचिवपदाची जबाबदारी दिली होती. गुरुवारी भाजपने नवी राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर केली. त्यामध्ये मोठ्या संख्येने मराठी नेत्यांना स्थान मिळाले आहे.माजी शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्याकडे हरयाणा, तर सुनील देवधर यांच्याकडे आंध्र प्रदेशचे प्रभारीपद देण्यात आले आहे. मध्य प्रदेशात २०२३ मध्ये, तर हरयाणात २०२४ मध्ये विधानसभा निवडणूक होत आहे.

भाजपा सरचिटणीस अरुण सिंह यांनी जारी केलेल्या प्रसिद्धीनुसार, कार्यकारिणीमध्ये मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, विधिमंडळ पक्षाचे नेते, माजी उपमुख्यमंत्री, राष्ट्रीय प्रवक्ते, राष्ट्रीय यांच्यासह 50 विशेष आमंत्रित आणि 179 कायम निमंत्रित (पदभार) असतील. आघाडी. अध्यक्ष, राज्य प्रभारी, सह-प्रभारी, प्रदेशाध्यक्ष, प्रदेश सरचिटणीस संघटना आणि आयोजक यांचा समावेश आहे. भाजपची राष्ट्रीय कार्यकारिणी विविध विषयांवर चर्चा करते आणि संघटनेच्या कामकाजाची चौकट ठरवते

माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, विनय सहस्रबुद्धे, चित्रा वाघ या महाराष्ट्रातील नेत्यांचा समावेश राष्ट्रीय कार्यकारणीत करण्यात आला आहे. काही महिन्यांपूर्वीच जावडेकरांनी केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे.२०२४ मध्ये महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक होत आहे. आ. आशिष शेलार,आ. सुधीर मुनंगटीवार यांना पक्षाने राष्ट्रीय स्तरावर संधी दिली आहे. विशेष निमंत्रितांमध्ये सुधीर मुनगंटीवार, आशिष शेलार यांचा समावेश करण्यात आला आहे.

 

राष्ट्रीय प्रवक्ते म्हणून सुनील वर्मा, हिना गावित, यांची वर्णी लागली आहे. माजी मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचाही समावेश करण्यात आला आहे. राज्य प्रदेशाध्यक्षपदी चंद्रकांत पाटील यांना कायम ठेवण्यात आले आहे. महाराष्ट्राचे प्रभारी म्हणून सीटी रवी, ओमप्रकाश धुर्वे, जयभान सिंग पवैय्या यांची नियुक्ती पक्षाने यापुढे कायम ठेवली आहे.

दीड वर्षांपूर्वी भाजपमध्ये आलेल्या ज्योतिरादित्य शिंदे आणि पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीपूर्वी कमळ हाती घेतलेला अभिनेता मिथुन चक्रवर्ती यांना भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारणीत स्थान मिळाले आहे. भाजपच्या नव्या राष्ट्रीय कार्यकारणीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, राजनाथ सिंह, अमित शाह, नितीन गडकरी, पियूष गोयल यां बुजूर्ग नेत्यांचे स्थान कायम राहिले आहे.

भाजप प्रदेशच्या महिला अध्यक्षा चित्रा वाघ यांना नव्या कार्यकारणीत स्थान देण्यात आले आहे. चित्रा वाघ यांची प्रथमच राष्ट्रीय कार्यकारणीत वर्णी लागली आहे. चित्रा वाघ गेल काही महिन्यांपासून सातत्याने राज्यातील ठाकरे सरकारला विविध मुद्द्यांवरून धारेवर धरत आहेत.

ग्लोबल न्युज नेटवर्क: