शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांची आज ९७ वी जयंती आहे. बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्त शिवसेनेच्या ठाकरे आणि शिंदे गटाकडून जोरदार तयारी करण्यात आली आहे. अशातच जयंती साजरी करण्यासाठी ठाकरे गट आणि शिंदे गटामध्ये चढाओढ सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. राजकारणातील विविध नेते त्यांना अभिवादन करत आहेत. याच दरम्यान महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील विनम्र अभिवादन केलं आहे,
देवेंद्र फडणवीस यांनी व्हिडीओच्या माध्यमातून आदरांजली वाहिली आहे. “हिंदूहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांचा आशीर्वाद आम्हाला सदैव लाभत राहो.” असं म्हटलं आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. तसेच उद्धव ठाकरेंना देखील टोला लगावला आहे. “बाबासाहेबांशी नातं हे रक्तानं होत नाही, जो विचारांशी नातं सांगेल, तोच खरा बाळासाहेबांचा अनुयायी असेल” असं म्हणत फडणवीसांनी जोरदार निशाणा साधला आहे.
“बाबासाहेबांशी नातं हे रक्तानं होत नाही, ते विचारांनी करावं लागतं. विचारांशी नातं हे बाळासाहेबांशी खरं नातं आहे. जो जो विचारांशी नातं या ठिकाणी सांगेल, तोच खरा बाळासाहेबांचा अनुयायी असेल. बाळासाहेबांना मानवंदना देताना आपण हा निर्धार करूया, ज्या विचारांनी बाळासाहेबांनी शिवसेना उभी केली, तो विचार मोडू दिला जाणार नाही” असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
हिंदूहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांचा आशीर्वाद आम्हाला सदैव लाभत राहो…#BalasahebThackeray pic.twitter.com/3rV4I4cT5k
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) January 23, 2023