नरेंद्र मोदींचं ९ वर्षांपूर्वीचं ते ट्विट पुन्हा चर्चेत, इंधन दरवाढ हे केंद्र सरकारचं अपयश

नवी दिल्ली : सध्या संपूर्ण देशात कोरोनाने हाहाकार माजवलेला असताना दुसरीकडे इंधनाच्या किमती वाढल्यामुळे सामान्य नागरिकांचे कंबरडं मोडलं आहे. आज डिझेलच्या दरांचीही वाटचाल शंभरीच्या दिशेने सुरु झाली आहे. असं असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदींचं एक जुनं ट्विट पुन्हा चर्चेत आलं आहे. हे ट्विट ९ वर्षांपूर्वीचे म्हणजेच २०१२ सालातील आहे.

मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना त्यांनी पेट्रोल दरवाढीवरुन तत्कालीन काँग्रेस सरकारवावर जोरदार टीका केली होती. पेट्रोल दरवाढीमुळे गुजरातवर मोठा आर्थिक भार पडेल असं मोदींनी म्हटलं होतं. आता नेटकऱ्यांनी इंधनाच्या दरांनी तीन आकडी संख्या गाठली असतानाच मोदींना या ट्विटची आठवण करुन दिली आहे. तसेच याच मुद्द्यावरून मोदी सरकारला धारेवर धरले आहे.

 

मोदी यांनी ट्विट केले होते की, पेट्रोलच्या दरांमध्ये झालेली वाढ ही काँग्रेच्या नेतृत्वामध्ये सत्तेत असणाऱ्या युपीए सरकारचं अपयश दाखवतं. यामुळे गुजरातवर हजारो कोटींचा आर्थिक भार येईल, असं मोदींनी या ट्विटमध्ये म्हटलं होतं. हे ट्विट २३ मे २०१२ रोजी करण्यात आलं होतं. आता अनेकांनी या ट्विटला रिप्लाय देण्यास सुरुवात केली आहे. सध्याच्या परिस्थितीमध्ये इंधनदरवाढ झालेली असताना ही दरवाढ म्हणजे आता केंद्रात सत्तेत असणाऱ्या सरकारचं अपयश नाहीय का असा प्रश्न अनेकांनी विचारला आहे. अनेकांनी या ट्विटखालीच मजेदार रिप्लाय देण्यास सुरुवात केली आहे.

Team Global News Marathi: